Aurangzeb : औरंग्याचे नाव घेणार्‍याला माफी नाही – देवेंद्र फडणवीस

औरंगजेबाचे फोटो कुणी झळकवणार असेल तर ते मान्य केले जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

155
आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज हेच आहेत. कुणी औरंग्याचे नाव घेणार असेल तर त्याला माफी नाही, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी, ५ जून रोजी दिला.
छत्रपती संभाजीनगरमधील एका युवकाने औरंगजेबाचा फोटो दाखवत नृत्य केल्याच्या बातमीसंदर्भात पत्रकारांनी विचारले असता ते बोलत होते. औरंगजेबाचे फोटो कुणी झळकवणार असेल तर ते मान्य केले जाणार नाही, असेही ते म्हणाले. कालच्या दिल्ली दौर्‍यासंदर्भात विरोधकांनी केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जे आरोप करतात, त्यांची अशी अवस्था आहे की, प्रात:विधीसाठी सुद्धा त्यांना हायकमांडची दिल्लीतून परवानगी घ्यावी लागते. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, आम्ही दिल्लीला गेलो तर काय वाईट आहे? राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणारच आहे आणि तो केव्हा होईल, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील. जिल्हा आणि तालुका स्तरापर्यंत दोन्ही पक्षांत समन्वय घडवायचा, यासंदर्भात व्यापक चर्चा काल करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.

धानोरकर कुटुंबियांचे सांत्वन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी मुंबईतील प्रभादेवी परिसरातील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींच्या निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर नागपूर येथून फडणवीस यांनी वरोरा गाठले आणि तेथे दिेवंगत खा. बाळू धानोरकर यांच्या घरी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. चंद्रपूरचे खा. बाळु धानोरकर यांचे अतिशय तरुण वयात निधन झाले. संघर्षातून पुढे आलेले हे नेतृत्त्व अतिशय झपाट्याने विकसित होत होते. पण, काळाने त्यांना आपल्यातून हिरावून घेतले, अशी शोकसंवेदना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.