इंडी आघाडीच्या (I.N.D.I. Alliance) पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी विविध नावांची चर्चा होत आहे. असे असताना, बुधवारी (०६ डिसेंबर) संजय राऊतांनी (Sanjay Raut) या पदासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दावेदार ठरू शकतात का, याबाबत एक सूचक विधान केले आहे. पंतप्रधान पदासाठी खरोखर एक चेहरा असणे आवश्यक आहे. ही एक महाआघाडी आहे. ही कोणत्याही प्रकारची हुकूमशाही नाही. येथे चर्चा घडते. चेहरा असला पाहिजे हे खरे आहे, त्यात गैर काहीच नाही, असे म्हणत सूचक विधान केले आहे. (Sanjay Raut)
दरम्यान संजय राऊत (Sanjay Raut) पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, उद्धव ठाकरेंचा चेहरा आहे. त्यांचा चेहरा हिंदुत्ववादी, राष्ट्रवादीचा आहे. इंडी आघाडीच्या (I.N.D.I. Alliance) सदस्यांची मान्यता मिळवणारी व्यक्ती पंतप्रधान पदाचा चेहरा असू शकते. मला बाहेरून असे काही बोलायचे नाही की ज्यामुळे युतीत फूट पडेल. (Sanjay Raut)
(हेही वाचा – Mumbai Police : बनावट वेबसाईट प्रकरणी गुन्हा दाखल)
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, नितीश कुमार (Nitish Kumar), ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या पार्टीकडून त्यांची नावे पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी सुचवली जात आहेत, असा प्रश्न पत्रकाराने विचारला. त्यावर संजय राऊत म्हणाले, या सर्व मुद्द्यांवर सध्या चर्चा सुरू आहे. कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. इंडी आघाडी (I.N.D.I. Alliance) ही विरोधकांची एकजूट आहे. ही एक महाआघाडी आहे. ही कोणत्याही प्रकारची हुकूमशाही नाही. येथे चर्चा घडते. अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या काळात जेव्हा आघाडी होती, तेव्हा ती आघाडीदेखील चर्चा करून निर्णय घेत असे. आताची तशी नसली तरी आताची आघाडी मात्र चर्चांना प्राधान्य देते. आघाडीला एक चेहरा असावा हा मुद्दा नक्कीच योग्य आहे. यात काहीच दुमत नाही. यावर पुढील बैठकीत नक्कीच चर्चा केली जाईल. (Sanjay Raut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community