मोजक्या मुसलमानांच्या फायद्यासाठी Waqf कायद्याच्या सुधारणेला होतोय विरोध

188
मोजक्या मुसलमानांच्या फायद्यासाठी Waqf कायद्याच्या सुधारणेला होतोय विरोध
मोजक्या मुसलमानांच्या फायद्यासाठी Waqf कायद्याच्या सुधारणेला होतोय विरोध

केंद्रीय मंत्री म्हणाले की, एखाद्या समाजाचा गैरवापर करणे चुकीचे आहे. मुस्लिमांना व्होट बँक बनवू नका, असा इशारा मी काँग्रेसला देतो. यावेळी काँग्रेसला अल्पसंख्याकांची मते मिळणार नाहीत याची काळजी घेऊ. तसेच वक्फ (Waqf) जमिनीवर कब्जा करण्यासाठी विरोधक वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करीत असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरण रिजीजू (Minister Kiran Rijiju) यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत घेतली. या विधेयकाच्या माध्यमातून मुस्लिमातील वंचित घटकांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Waqf)

(हेही वाचा – Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये पोलिसांना मोठे यश; नारायणपूर चकमकीत ३० नक्षलवादी ठार)

देशातील मुस्लीम समुदायामधील वंचित तसेच मागासवर्गीय दयनीय अवस्थेत असून काही मोजक्या मुस्लिमांना फायदा पोहोचवण्यासाठी विरोधक वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील बौद्ध धर्मीयांची प्रार्थना स्थळे तसेच चैत्यभूमी, दीक्षाभूमी यांच्या विकासासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असल्याचे सांगून राज्यातील या धार्मिक स्थळांचा विकास आवश्यक आहे. त्याचे प्रस्ताव राज्य शासनाने अल्पसंख्यांक मंत्रालयाला पाठवण्याचे देखील त्यांनी सुचवले. मणिपूर मधील हिंसाचार हा जातीय तसेच स्थानिक समुदायाच्या परस्पर संघर्षातून होत असून काँग्रेसच्या कारभारामुळे दहा वर्षात हा दहशतवाद आणि संघटना फोफावल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्र शासन यावर योग्य ती कारवाई करीत असून लष्करी कारवाई हा काही या हिंसाचारावर उपाय नाही असे देखील रिजीजू यांनी स्पष्ट केले.  (Waqf)

(हेही वाचा – Assembly Elections : निवडणूक कर्मचाऱ्यांचे योग्य व्यवस्थापन करून योग्यप्रकारे काम करून घेण्याच्या डॉ. जोशी यांच्या सूचना)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मार्गदर्शनानुसार, विशेषत: महाराष्ट्रातील बौद्ध धार्मिक स्थळांचा विकास करण्यात येणार असून यासाठी आपण मुंबईला चैत्यभूमीला देखील भेट दिल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय नागपुरातील दीक्षाभूमीचे (Dikshabhumi) दर्शन आपल्यासाठी विशेष असल्याचे सांगत इथे आपल्याला प्रेरणा आणि शिक्षा मिळते असे देखील ते म्हणाले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.