मुंडेंच्या जागी भुजबळ? – मंत्रिपदाच्या रिक्त जागेवर Chhagan Bhujbal यांची वर्णी लागण्याची शक्यता

35
मुंडेंच्या जागी भुजबळ? – मंत्रिपदाच्या रिक्त जागेवर Chhagan Bhujbal यांची वर्णी लागण्याची शक्यता
  • प्रतिनिधी

धनंजय मुंडे यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची वर्णी लागण्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात या संदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मिळाली आहे.

(हेही वाचा – आमदार Abu Azmi यांच्याविरुद्ध मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल)

मुंडेंच्या राजीनाम्यानंतर महायुतीचे सरकार नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झाले, परंतु अडीच महिन्यांच्या आतच मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड असल्याची माहिती CID च्या आरोपपत्रातून समोर आली असून, वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचेही समोर आले. विरोधकांनी या प्रकरणी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलिया ऑल आऊट; भारतासमोर २६५ धावांचे लक्ष्य)

या पार्श्वभूमीवर, मुंडेंच्या जागी छगन भुजबळांची (Chhagan Bhujbal) वर्णी लागण्याची शक्यता आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर छगन भुजबळ यांना पूर्वीच मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते, ज्यामुळे तेव्हापासून भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज झाले होते. राजकीय वर्तुळात या निर्णयाबाबत चर्चा सुरू असून, भविष्यात कोणत्या नेत्याची निवड होईल हे निश्चित करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.