-
खास प्रतिनिधी
महाविकास आघाडीतील धुसपुस विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विधानसभेत दिसून आली. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्यामुळे त्यांना निलंबित करावे, अशी जोरदार मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभागृहात करत होते तेव्हा शिवसेना उबाठा आमदार आदित्य ठाकरे, भास्कर जाधवसह काहींनी गदारोळ करण्यास सुरूवात केली मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे (शप) आमदार सभागृहात शांत बसून सगळे पहात होते. त्यामुळे सत्ता गेली, निवडणुकीत आमदार पडले तरी ‘मविआ’मध्ये अंतर्गत धुसफूस सुरूच असल्याचे दिसून येत आहे. (MVA)
आझमी यांच्या निलंबनाची मागणी
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी ३ मार्च २०२५ पासून मुंबईत सुरू झाले आणि पहिल्याच दिवशी अबू आझमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. ‘औरंगजेब हा क्रूर प्रशंसक नव्हता’ असे आझमी म्हणाले होते. त्यावर मंगळवारी शिवसेना (शिंदे) पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात आझमी यांच्या निलंबनाची मागणी केली. (MVA)
(हेही वाचा – आता नाशिकमध्ये धावणार Compact Metro; सर्वेक्षणाला सुरुवात)
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आझमी यांचा आम्ही निषेध करतो असे सांगून शिंदे म्हणाले, “अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ.” (MVA)
शेर शिवा का छावा था
“अबु आझमीसारखी माणसं शरीरानं भारतात राहात असली तरी मनानं मोगलाईतच जगत आहेत. त्यांना देशाच्या इतिहासाशी, संस्कृतीशी कसलंही देणंघेणं नाही. औरंगजेब कसा शासक होता हे जगाला माहीत आहे. औरंगजेब क्रुरकर्मा होता. तो कसला उत्तम प्रशासक. अशा राक्षसांची भलामण करणाऱ्या पिलावळीचा आम्ही धिक्कार करतो,” असे सांगितले. “शंभूराजे हे महापराक्रमी होते. उत्तम प्रशासक होते. औरंगजेबाचा खोटा इतिहास सांगण्यापेक्षा संभाजी महाराजांचा खरा इतिहास अबू आझमींनी शिकावा असे सांगून ‘देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एक ही शंभू राजा था” या ओळीने उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनाचा समारोप केला.
या भाषणावेळी शिवसेना उबाठा आमदार आदित्य ठाकरे, भास्कर जाधव आणि अन्य आमदार शिंदे यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत होते, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शप) आमदार अलिप्त राहत आसनावर बसून उबाठाची सुरू असलेली आरडाओरड शांतपणे बघत होते. (MVA)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community