मुंबई पाल‍िका रुग्णालयातील औषध खरेदीची चौकशी होणार

158
मुंबई पाल‍िका रुग्णालयातील औषध खरेदीची चौकशी होणार

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील औषध खरेदीची उच्चस्थरीय चौकशी करण्यात येईल, तसेच मुंबई महापालिका रुग्ण सेवेची श्वेतपत्रिकाच एकदा काढावी लागेल, अशी स्पष्ट भूमिका मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत मंडळी.

मुंबईतील आरोग्य सेवेबाबतची अर्धातास चर्चा शुक्रवारी सकाळी विधनसभेच्या विशेष कामकाजात आमदार अमिन पटेल यांनी उपस्थित केली होती. या चर्चेत सहभागी होताना आमदार ॲड. आशिष शेलार यांनी मुंबईतील आरोग्य सवेचा आढावा सभागृहासमोर मांडला. शेलार म्हणाले की, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असल्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनसुद्धा रुग्ण मोठया प्रमाणात येथे येतात. मुंबईत महापालिका, राज्य शासन, खासगी, धर्मादाय, आण‍ि केंद्रीय कामगार अशी विविध रुग्णालये असून या सगळ्यांचा ताळमेळ दिसून येत नाही. त्यामुळे सरकारने एकदा या सगळयाचा एक समग्र आढावा घेऊन किती रुग्ण मुंबईत येतात, त्यांना असलेली रुग्णालये पुरेशी आहेत का? त्यावर किती खर्च होतो या सगळयाची श्वेतपत्रीका काढावी, अशी मागणी शेलार यांनी केली.

(हेही वाचा – Dada Bhuse : वाहन चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करणार – दादा भुसे)

धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारीत येणारी जी रुग्णालये आहेत त्यांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या सुविधा व रुग्णालयाकडून मिळणारी सेवा याबाबतचा आढावा घेऊन त्याची पडताळणी करण्यात यावी. त्यांच्याकडून शासनाच्या अटीशर्ती पाळण्यात येतात का, अशी दुसरी मागणी आमदार शेलार यांनी केली.

वर्षाला ४ हजार कोटी खर्च

– मुंबई महापालिका सुमारे ४ हजार कोटी रुपये आरोग्यासाठी वर्षाला खर्च करते. म्हणजे पाच वर्षात २० हजार कोटी रुपये आरोग्य यंत्रणेवर खर्च केले. जातात साधारणत: ढोबळ अंदाज मांडला तर ४५ हजार मुंबईकरांसाठी हे खर्च होतात. यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला जातो. मुंबईकर ज्या पद्धतीने कर देतात त्या पटीने त्यांना सुविधा मिळत नाही यामध्ये कुठेही ताळमेळ दिसून येत नाही, महापालिका एकिकडे पाच वर्षाला २० हजार कोटी रुपये खर्च करते आण‍ि रुग्णांना औषधे मिळत नाहीत.

– पालिका रुग्णालयात गेलेल्या रुग्णांना बाहेर औषधे आणण्यासाठी पाठविण्या येते, एक्सरे, सोनोग्राफीसाठी बाहेर पाठवले जाते. त्यामुळे यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली.

– खासगी रुग्णालयात जी औषधे आण‍ि इंजेक्शन दिली जातात त्याचे दर अवाजवी आकारले जातात, त्यामुळे रुग्णांना नाहक फटका बसतो त्यामुळे सरकारने यासाठी एक दरपत्रक जाहीर करावे. तसेच मुंबईत येणा-या कॅन्सर रुग्णालयांच्या नातेवाईंची राहण्याची मोठी गैरसोय होते त्यासाठी काही खास इमारती बांधण्यात याव्यात अशी मागणीही शेलार यांनी केली.

– त्यावर उत्तर देताना मंत्री उदय समांत यांनी मुंबईतील आरोग्य सेवेची श्वेतपत्रीका काढण्याची गरज मान्य केली तसेच मुंबई महापालिका रुग्णालयातील औषध खरेदीची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.