मुंबईत एकही अनधिकृत मशीद राहणार नाही; Kirit Somaiya यांचा इशारा

57
मुंबईत एकही अनधिकृत मशीद राहणार नाही; Kirit Somaiya यांचा इशारा
  • प्रतिनिधी

मुंबईतील सर्व अनधिकृत मशिदी पाडल्या जाणार असून, एकही अनधिकृत मशीद शिल्लक राहणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिला आहे. अनधिकृत बांधकामांविरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांनी मुंबईतील विविध भागांमध्ये कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले. भांडुप आणि मानखुर्द येथील अनधिकृत मशिदींना नोटिसा बजावण्यात आल्या असून, पुढील कारवाई लवकरच होईल, असेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – मुस्लिम तरुणीसोबत उद्यानात बसल्याने Hindu तरुणाला मारहाण; मात्र काँग्रेस नेत्याने घेतली अजब भूमिका)

सोमय्या (Kirit Somaiya) यांनी यापूर्वी गोवंडी, शिवाजी नगर परिसरातील अनधिकृत भोंग्यांविरोधात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या मते, मुंबईत सुमारे चार हजार अनधिकृत भोंगे असून, यातील बहुतांश मशिदींनी भोंग्यांसाठी परवानगी घेतलेली नाही. “कायद्याचे पालन सर्वांना बंधनकारक आहे. अनधिकृत बांधकामे आणि भोंगे हटवण्यासाठी सरकार आणि प्रशासन कठोर पावले उचलत आहे,” असे सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठामपणे सांगितले.

(हेही वाचा – रायगडावरील सभेत खासदार उदयनराजे यांनी Amit Shah यांच्याकडे केल्या ‘या’ मागण्या)

भांडुप आणि मानखुर्द येथील नोटिसांमुळे स्थानिक पातळीवर चर्चांना उधाण आले आहे. सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या या कारवाईला काहींनी पाठिंबा दिला असला, तरी काही गटांनी याला विरोध दर्शवला आहे. यावर सोमय्या म्हणाले, “आम्ही कोणत्याही धर्माविरोधात नाही, पण कायद्याचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही.” या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून, येत्या काळात याचे पडसाद कसे उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.