Loksabha Election 2024 : मतदानावेळी ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरले जाणार ‘हे’ 12 पुरावे

221
Lok Sabha Election 2024 : माढ्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या मतदानावेळी मतदारांना मतदान केंद्रावर आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदारांना देण्यात आलेले मतदार ओळखपत्राशिवाय बारा प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. (Loksabha Election 2024)

(हेही वाचा – Gopinath Munde : शरद पवार तुमच्यावर ही अशीच वेळ येणार; गोपीनाथ मुंडे यांचा ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल)

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात (Jalgaon Lok Sabha Constituency) 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र (Election Identity Card) याशिवाय पारपत्र (पासपोर्ट ), वाहन चालक परवाना (लायसन्स ), केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीचे स्वतःचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, बँक,टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांचे द्वारे नॅशनल पोपुलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले जॉब कार्ड, भारत सरकारच्या सर्व मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत निर्गमित हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतनाची कागदपत्रे, खासदार आमदारांना देण्यात आलेली अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र हे 12 पुरावे मतदानासाठी आवश्यक असणार आहेत. (Loksabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.