Third Front : ‘परिवर्तन महाशक्ती’मुळे कुणाला फटका बसणार?

148
Third Front : ‘परिवर्तन महाशक्ती’मुळे कुणाला फटका बसणार?
  • खास प्रतिनिधी 

राज्याच्या राजकाकरणात महाविकास आघाडी आणि महायुतीशिवाय आता ‘परिवर्तन महाशक्ती’ नावाची तिसरी आघाडी तयार झाली असून ही नवी आघाडी कुणाला धोकादायक ठरणार, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतून नाराज झालेल्या लहान राजकीय पक्षांनी आपली वेगळी ‘परिवर्तन महाशक्ती’ आघाडी उघडली आहे. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उबाठा या महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत, तसे संकेत उबाठाने दिले आहेत. (Third Front)

(हेही वाचा – Crime : बेस्ट वाहकावर चाकू हल्ला करणाऱ्याला १२ तासांत केली अटक)

कार्यपद्धतीवर नाराजी

स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू या तिसऱ्या आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी महाविकास आघाडी तसेच महायुतीसोबत काम केले असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत तिसरी आघाडी उघडण्याचा निर्णय घेतला. या आघाडीत अन्य महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकरअण्णा धोंडगे, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, नारायण अंकुशे हेदेखील सहभागी झाले. छत्रपती संभाजीराजे यांनी तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनाही या आघाडीत सामील होण्याचे आवाहन केले. आणखी काही लहान पक्षांना या आघाडीत सहाबगी करण्याचे प्रयत्न पुढे केले जातील असेही सांगण्यात आले. (Third Front)

(हेही वाचा – Edible Oil Prices : गृहिणींचे बजेट बिघडणार, खाद्यतेलाच्या भावात वाढ)

एकत्रित मेळावा २६ सप्टेंबरला

या ‘परिवर्तन महाशक्ती’चा एकत्रित मेळावा येत्या २६ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होईल, अशी घोषणाही करत शेट्टी म्हणाले, विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी हा एक सक्षम पर्याय म्हणून जनतेसमोर असेल.

महाविकास आघाडीला धडकी

तिसऱ्या आघाडीची घोषणा होताच महाविकास आघाडीला धडकी भरली असून त्यांचीच मते ही आघाडी खाणार, अशी भीती महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तिसऱ्या आघाडीला बदनाम करण्याचे प्रयत्न शिवसेना उबाठाकडून तात्काळ सुरू झाले. (Third Front)

(हेही वाचा – १०० दिवसांत १५ लाख कोटींचे प्रकल्प, जाणून घ्या Modi Govt ने किती पैसा कुठे गुंतवला? )

विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी

शुक्रवारी २० सप्टेंबरला सकाळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “तिसरी आघाडी ही कायम सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवली जाते. केंद्रात आणि राज्यात जे सत्तेत असताना ते तिसरी आघाडी निर्माण करून विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजवण्याचा प्रयत्न करतात. आतापर्यंत इतिहास आणि अनुभव हेच सांगतो. विधानसभेला महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढत आहे, पण महाविकास आघाडीची मतं थोडीफार कमी करण्यासाठी नवीन आघाडी स्थापन करायची आणि त्यासाठी पैशांचा, पदांचा वापर करायचा असे धोरण दिसत आहे.” (Third Front)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.