शर्यतीच्या आदल्या दिवशी पोलिसांनी ज्या मैदानात शर्यत होणार आहे, त्याठिकाणी येऊन जेसीबीच्या सहाय्याने मैदान खोदले, त्यावर आडवे चरे मारले. त्यामुळे अशा परिस्थिती मैदानात आता बैलगाड्या धावूच शकणार नाहीत, अशी प्रशासनाची खात्री झाली. मात्र, पडळकर समर्थकांनी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास तिथूनच पाच किमी अंतरावर असलेल्या दुसऱ्या एका मैदानात धावपट्टी तयार केली आणि पहाटे पाच वाजता त्या धावपट्टीवर स्पर्धा भरवली. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या शर्यतीत पाच ते सहा बैलगाड्या चालक आणि मालक सहभागी झाले होते. एवढेच नाही तर ही शर्यत पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक देखील जमले होते.
(हेही वाचाः पडळकरांनी मारली बाजी… पोलिसांच्या नाकावर टिच्चून बैलगाडा शर्यत)
पोलिसांच्या नोटिशीला केराची टोपली
सांगली जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दोन दिवसांपूर्वी नोटीस काढली होती. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर प्रतिबंध आणला आहे, तसेच कोरोना प्रतिबंधात्मक नियमानुसारही या शर्यतीचे आयोजन करता येणार नाही. बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांना सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस देण्यात यावी. आयोजक तरीही शर्यतीसाठी आग्रही असतील, तर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कायदेशीर कारवाई करावी, असे या नोटिशीत म्हटले होते. ज्या-ज्या मार्गावरुन बैलगाड्या येणार आहेत, त्याची पाहणी करुन त्यावर प्रतिबंध आणावा. १७ ऑगस्टपासूनच नाकाबंदी लागू करावी, असे देखील या नोटिसमध्ये म्हटले होते. मात्र, ही स्पर्धा पार पडल्याने आता या नोटिशीला केराची टोपलीच दाखवल्याचे स्पष्ट होत आहे.
Join Our WhatsApp Community