पीएम मोदींनी महाराष्ट्राच्या विजयाचे वर्णन विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडिया एक्सवर लिहिले आहे की, एनडीएला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातील बंधू-भगिनींचे, विशेषतः राज्यातील तरुण आणि महिलांचे मनःपूर्वक आभार. तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमची युती यापुढेही कार्यरत राहील, असे आश्वासन एक्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिले. (PM Narendra Modi)
महाराष्ट्रात महायुतीचा झेंडा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (maharashtra Assembly Election) भाजपाने १३२ जागा जिंकल्या आहेत आणि ५१ जागांवर आघाडीवर आहे, तर मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) यांनी अनुक्रमे ५६ आणि ४१ जागा जिंकल्या आहेत. भाजपाच्या प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये विद्यमान आमदार नितीश राणे यांचा समावेश आहे, ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभेची जागा 58,007 मतांच्या फरकाने जिंकली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कुलाबा मतदारसंघातून ४८,५८१ मतांनी विजय मिळवला आहे, तर शिवेंद्रराजे भोसले यांनी साताऱ्यातून १,४२,१२४ मतांनी विजय मिळवला आहे.
Development wins!
Good governance wins!
United we will soar even higher!
Heartfelt gratitude to my sisters and brothers of Maharashtra, especially the youth and women of the state, for a historic mandate to the NDA. This affection and warmth is unparalleled.
I assure the…
— Narendra Modi (@narendramodi) November 23, 2024
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शिर्डीतून ७० हजार २८२ मतांनी विजय मिळवला. भाजपचे खासदार नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून ८,१७६ मतांनी विजयी झाले. राज्यमंत्री आणि शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत (Uday Samantha) रत्नागिरीतून तर दीपक केसरकर सावंतवाडी मतदारसंघातून अनुक्रमे ४१,५९० आणि ३९,८९९ मतांनी विजयी झाले.
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election Result 2024: वांद्रे पश्चिममध्ये भाजपची पुन्हा एकदा बॅटिंग, Ashish Shelar यांची हॅट्रिक)
शिवसेनेने ३५ जागा जिंकल्या असून २२ जागांवर त्यांचे उमेदवार पुढे आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने २८ जागांवर विजय मिळवला असून १३ जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघातून ४४,४०३ मतांनी विजयी झाले, तर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातून आदिती तटकरे ८२,७९८ मतांच्या फरकाने विजयी झाल्या आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community