
-
प्रतिनिधी
पोलिसांवरील हल्ला क्षम्य नाही. त्यामुळे नागपूर हिंसाचाराच्या घटनेत ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला, अशांना कबरीतून शोधून काढू. या आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी बुधवारी विधानसभेत दिला. नागपूर हिंसाचार प्रकरणात ज्यांनी सामाजिक स्वाथ्य बिघडवले त्यांच्यावर कारवाई होईलच. शिवाय ज्यांनी अफवा पसरवल्या त्यांनाही या घटनेत दोषी धरले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बुधवारी विधानसभेत २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातील गृह विभागाच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. तत्पूर्वी झालेल्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी नागपूर दंगल प्रकरणात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतल्याचे सांगितले. नागपूरची घटना ही पूर्वनियोजित होती. नागपूर पोलीस आयुक्तांनी याबाबत वेगळे मत मांडलेले नाही. त्यांच्याकडून माहिती घेऊनच आपण सभागृहाला माहिती दिली. नागपूर हे शांत शहर आहे. १९९२ नंतर नागपूरमध्ये कधीही दंगल झालेली नाही. मात्र, परवाची घटना काहींनी जाणीवपूर्वक घडवून आणल्याचे लक्षात येते, असा पुनरुच्चार फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केला.
(हेही वाचा – Nagpur Violence: पोलिसांवर हात उचलणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखवणार; गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांचा इशारा)
औरंगजेबाची कबर जाळली. मात्र, त्यावर कुठेही आयात लिहिलेली नव्हती. तरीही जाणीवपूर्वक आयात जाळल्याचे संदेश फिरवले गेले. त्यामुळे या प्रकरणात विशिष्ट वेळेत कारवाई केली जाईल, असे आश्वासन फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सभागृहाला दिले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांना सामोरे जाताना राज्याची कायदा आणि सुव्यवस्था चांगली राखली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आपल्या उत्तरात महाराष्ट्रातील गुन्ह्यांच्या घटना, आरोपी पकडण्याचे प्रमाण, दोषसिद्धी याची तुलना देशाच्या अन्य राज्यांशी, शहरांशी केली. गुन्हेगारीत देशातील पहिल्या १० शहरांमध्ये राज्यातील एकही शहर नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात शहरीकरण होऊन विकास होत असतनाही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती उत्तम आहे. २०१३ मध्ये दिल्लीत निर्भया कांड घडल्यानंतर विनयभंगाच्या गुन्ह्यातील अनेक कलमे आता बलात्काराच्या गुन्ह्यात लावली जातात. याशिवाय तक्रारींचे प्रमाण वाढल्याने २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये विनयभंग आणि बलत्काराच्या गुन्ह्यात वाढ झाल्याची कबुली फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिली.
(हेही वाचा – Google Buys Wiz : क्लाऊड सुरक्षा कंपनी विझ गुगलच्या ताब्यात)
सध्या ९० टक्के प्रकरणात ६० दिवसात आरोपपत्र दाखल होत आहे. दोषसिद्धीचे प्रमाण ९ टक्क्यांवरून आता ५० टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. गुन्ह्याच्या प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड होऊ नये यासाठी पंचनाम्याचे चित्रीकरण केले जाणार आहे. त्यासाठी पोलिसांना टॅब दिला जाईल. सायबर गुन्हे रोखण्यासाठी नवी मुंबईत आधुनिक महासायबर लॅब सुरु करण्यात आली आहे. तीन राज्यांनी आपल्या सायबर लॅबला काम दिले आहे, अशी माहिती फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिली.
दरम्यान, पोलीस दलात १० हजार ५०० जागा रिक्त असून गेल्या तीन वर्षात पोलिसांची विक्रमी ३५ हजार ८०२ पदे भरण्यात आली आहेत. ज्या प्रमाणात पोलीस दलातून अधिकारी-कर्मचारी निवृत्त होत आहेत, त्या प्रमाणात पोलिसांची पदे भरण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असेही फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. दहिसर येथील अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र सादर केले असले तरी या प्रकरणाची चौकशी बंद करू नये, अशी सूचना पोलिसांना दिल्याचा खुलासाही त्यांनी केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community