गेट बाहेर न येणारे आता बांधावर पोहोचले; CM Eknath Shinde यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

158
गेट बाहेर न येणारे आता बांधावर पोहोचले; CM Eknath Shinde यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
गेट बाहेर न येणारे आता बांधावर पोहोचले; CM Eknath Shinde यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

उबाठा (UBT) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या टीकेला आता एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिल आहे. प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले की, पापाचा घडा कोणाचा भरला हे उद्धव ठाकरेंना विधानसभेत दिसेलच. महाविकास आघाडीच्या दोन अडीच वर्षाचे काम आणि आमचं दोन वर्षाचं काम याची जनता तुलना करेल. काम करणाऱ्याच्या पाठीशी जनता उभी राहील, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. तर घराच्या गेटमधूनच प्रवेश नाकारणारे आता शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत, त्याचे श्रेय देखील व आनंद देखील आम्हालाच आहे, असा खोचक टोला शिंदे यांनी ठाकरेंना लगावला. ठाकरे यांनी संभाजीनगरात केलेल्या टीकेला शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.  (CM Eknath Shinde)

“लहान बाळासारखे किती वेळा रडणार? ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तुम्हाला सहाव्या नंबरवर जनतेने टाकलेलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला दुसऱ्या नंबरची मतं मिळालेली आहेत”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. “लोकसभेमध्ये लोकांनी दाखवून दिलं, उद्धव ठाकरेंच्या पक्षापेक्षा आम्हाला जास्त मते मिळाले. आम्हाला 19 टक्के मते मिळाली, तर ठाकरे यांना 14 टक्के मतं. लोकांनी आता शिक्कामोर्तब केलंय”, असादेखील दावा एकनाथ शिंदे यांनी केला.  (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Legislative Council: शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा सोमवारी शपथविधी)

“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडल्याने लोकांनी आमच्या बाजूने मतदान केलं. आम्ही ऐकून 13 जागा लढलो. त्यापैकी 7 जिंकलो. त्यांच्यापेक्षा दोन लाख मतं आम्ही जास्त घेतले. उद्धव ठाकरेंच्या सेनेचा 42 टक्के स्ट्राईक रेट होता. तर आमच्या 47 टक्के स्ट्राइक रेट आहे. आता रडणं बंद करा. विधानसभेत या. लोकसभेत कशा जागा मिळाल्या, कोणामुळे मिळाल्या, ते महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. (CM Eknath Shinde)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.