भाजपाचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरेंवर टीकेचा निशाणा साधला आहे. बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरे वारंवार भाष्य करत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेलार यांनी त्यांना टोला लगावत सोशल मीडियावर एक पोस्ट केली. (Ashish Shelar)
(हेही वाचा- ट्रम्प सत्तेत येताच अमेरिकेतील भारतीय वंशाचे नेते Vivek Ramaswamy यांनी दिला राजीनामा; काय आहे कारण…)
शेलार म्हणाले की, “ज्यांचे विधानसभेत कधीही भाषण गाजले नाही, ज्यांचा मंत्री म्हणून कोणताही निर्णय दूरगामी ठरला नाही, ज्यांनी मुंबईतील खड्डेही भरले नाहीत आणि ज्यांची बातमी ‘सामना’च्या पहिल्या पानावरही हल्ली छापली जात नाही, असे आदित्य ठाकरे सध्या बांगलादेशी घुसखोरीवर अफाट ज्ञान प्रदर्शित करत आहेत.” (Ashish Shelar)
त्यांनी भाजपशासित आसाम आणि त्रिपुरामध्ये बांगलादेशी घुसखोरी होत नसल्याचा उल्लेख केला आणि पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर घुसखोरीस अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याचा आरोप केला. शिवाय, ममतांनी सीमा सुरक्षा दलाच्या तैनातीला विरोध केल्याचेही शेलार यांनी म्हटले. (Ashish Shelar)
(हेही वाचा- Washim Accident : वाशिममध्ये 3 वाहनांचा विचित्र अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी)
शेलार यांनी आदित्य ठाकरेंना आव्हान दिले की, त्यांनी ‘देश प्रथम, नंतर पक्ष, आणि शेवटी कुटुंब’ अशा भावनेने एकदा तरी देशासाठी ठाम भूमिका घेतली पाहिजे. “तसे केल्यास तुम्ही राष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेत याल,” असा सल्लाही त्यांनी दिला. (Ashish Shelar)
या टीकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, शिवसेनेच्या वतीने या वक्तव्यावर काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Ashish Shelar)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community