‘हातात संविधान घेऊन फिरणाऱ्यांनीच संविधान आणि लोकशाहीची हत्या केली’ – केंद्रीय मंत्री Kiren Rijiju

304

आगामी विधानसभा निवडणुकीची (Assembly Election 2024) जोरदार तयारी सुरू आहे. नेतेमंडळी प्रचारसभा घेण्यात व्यस्त आहेत. तर काही केंद्रीय मंत्र्यांनी देखील कंबर कसली असून, पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षांचा खरपूस समाचार घेत आहेत. दरम्यान, काँग्रेसने (Congress) मुस्लिमांना व्होट (Muslims Vote) बँक म्हणून पाहिले. त्यामुळे ते अल्पसंख्याक मंत्रालय हे मुस्लिम मंत्रालय असल्याचे दाखवण्याचे प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रीजिजू यांनी सोमवारी (०७ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत केला.  (Kiren Rijiju)

पत्रकार परिषद घेत केंद्रीय मंत्री Kiren Rijiju म्हणाले की, महाराष्ट्र मध्ये मी दौरा करत आहे कारण महाराष्ट्र वीरांची भूमी असून त्यातून देशाला प्रेरणा मिळते. राज्याला देशातील राजकारणात सध्या बदनाम करण्यात आले असून विरोधकांकडून दिशाभूल करण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी दुषप्रचार करतात की, भारतात लोकशाही संपुष्टात आली आहे. अल्पसंख्याक यांची गळचेपी होत आहे परदेशात जाऊन देशाला बदनाम करण्याचे काम विरोधक करत आहे. देशविरोधी यांच्याशी संगनमत करून वेगवेगळे आरोप केले जातात

‘जे संविधान हातात पकडून फिरत आहेत त्यांनीच संविधान, लोकशाहीची हत्या केली होती.’ बाबासाहेब आंबेडकरांना (Dr. Babasaheb Ambedkar) संसदेत येण्यापासून रोखले, मंत्रिमंडळातही घेतले नव्हते, पंडित नेहरूंनी त्यांचा वारंवार अपमान केला. हेच लोक आता भाजपाकडून संविधान धोक्यात आहे, मुस्लिमांचा वोट बँक म्हणून वापर करत आहेत. पण दरवेळी हा समाज काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही, अशी टीका केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी केली.

(हेही वाचा –नक्षलवादी तरुणांनी शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, Amit Shah यांचे आवाहन )  

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संविधान यात्रा, संविधान दिवस, संविधान पूजन सुरू केले. सबका साथ, सबका विकास यादृष्टीने आम्ही देशाचा विकास करत आहे. सन २०४७ मधील विकसित भारत यादृष्टीने काम करत आहे. महाराष्ट्र मध्ये प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन निर्माण करण्याचे आम्ही ठरवले असून ते सर्व धर्मियांसाठी असेल. बौद्ध विहार यांच्यासाठी विशेष मदत करण्यात येणार आहे कारण त्यांना सुरवातीला दुर्लक्षित करण्यात आले होते. (Kiren Rijiju)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.