JALNA MARATHA RESERVATION : आंदोलक व जखमींना भेटण्यासाठी येणाऱ्यांनी अवश्य यावे. पण राजकारण करू नये – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

बरेच लोक मराठा समाज व त्यांच्या आरक्षणावर राजकारण करत आहेत

115
JALNA MARATHA RESERVATION : आंदोलक व जखमींना भेटण्यासाठी येणाऱ्यांनी अवश्य यावे. पण राजकारण करू नये - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
JALNA MARATHA RESERVATION : आंदोलक व जखमींना भेटण्यासाठी येणाऱ्यांनी अवश्य यावे. पण राजकारण करू नये - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

जालन्याच्या अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण (JALNA MARATHA RESERVATION)  करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी (०१सप्टेंबर) लाठीमार केला. त्यानंतर झालेल्या गोंधळात पोलिस व आंदोलक दोघेही जखमी झाले.आंदोलक व जखमींना भेटण्यासाठी येणाऱ्यांनी आवश्य यावे. पण राजकारण करू नये, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे ६० मोर्चे निघाले. पण एकदाही शांतता भंग झाला नाही. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले नाही. कुठे गालबोटही लागले नाही. पण काल या आंदोलनाला गालबोट लागले. त्यामुळे काल झालेल्या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे.या मुद्याचे राजकारण करणाऱ्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. आपल्या हातात सत्ता होती, जनतेने तुमच्या पेनमध्ये सही करायची ताकद दिली होती, तेव्हा तुम्ही काय केले? याचे आत्मपरीक्षण करावे. त्यानंतर बोलावे. यांच ४५ वर्षे सरकार होते. पण फडणीस यांच्या काळात मराठा आरक्षणाचा निर्णय झाला, असे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले.

(हेही वाचा : Jalna Maratha Andolan : जालन्यातील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पुढे ढकलला)

मराठा आरक्षणाप्रकरणी सुप्रीम कोर्टात युक्तिवाद झाला. हायकोर्ट अन् विधिमंडळातही झाला. पण नतदृष्ट उद्धव ठाकरे यांच्या सरकारने सुप्रीम कोर्टात योग्य पद्धतीने बाजू मांडली नाही. तेव्हापासून आरक्षणाचा वाद चिघळला. आता बरेच लोक मराठा समाज व त्यांच्या आरक्षणावर राजकारण करत आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.

उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे
तुम्ही या भेटा पण राजकारण करू नका. शरद पवारांनीही तिथे जावून भेटावे. मराठा समाज सहसा राज्यातील कोणत्याही संपत्तीला नुकसान पोहोचणार नाही असे वागत नाही. त्यामुळे आत्ताच गालबोट कसे काय लागले? याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.