गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या काही मोठ्या निर्णयांमध्ये प्रामुख्याने बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा असेल, नवीन टॅरिफ धोरण (आयात शुल्क) असेल किंवा अमेरिकेतील कर्मचारी कपातीचा निर्णय असेल अशा निर्णयांचा समावेश आहे. ट्रम्प (Donald Trump) यांच्या निर्णयाचा जगभरातील अनेक देशांना फटका बसला आहे.
HAPPENING NOW: A MASSIVE protest is taking place in downtown Chicago for the “Hands Off!” movement against Elon Musk and Donald Trump pic.twitter.com/NVEiTFi8Iy
— Marco Foster (@MarcoFoster_) April 5, 2025
दरम्यान, आता डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि त्यांचे सल्लागार एलॉन मस्क यांच्या विरोधात अमेरिकेत मोठ्या प्रमाणात नागरिक निदर्शने करत असल्याची माहिती समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या धोरणांच्या विरोधात अमेरिकन नागरिक ‘हॅन्ड्स ऑफ’ असे पोस्टर्स हातात घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. सरकारी नोकऱ्यांमध्ये कपातीचा निर्णय, देशाची अर्थव्यवस्था, मानवाधिकार आणि टॅरिफ धोरण अशा मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन नागरिकांनी शनिवारी मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले आहेत. (Donald Trump)
More than 1,200 protests have erupted across the United States in opposition to Donald Trump today.
Notable cities include Chicago, New York, LA, Boston, and Providence. pic.twitter.com/GYB4KSQ8Ny
— Pop Crave (@PopCrave) April 5, 2025
काही दिवसांपूर्वी युनायटेड स्टेट्समधील सरकारी जमिनींचे व्यवस्थापन आणि माजी सैनिकांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी कपात करण्यात आली, गृह, ऊर्जा, माजी सैनिक व्यवहार, कृषी, आरोग्य आणि मानवी सेवा अशा विभागातील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. अशा वेगवेगळ्या निर्णयांच्या निषेधार्थ आता अमेरिकन नागरिकांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला आहे. (Donald Trump)
BREAKING: 100,000 people are gathering on the National Mall in DC to protest Donald Trump and Elon Musk. Over 1,200 of these rallies are being held today by patriotic Americans who are fed up with MAGA chaos and lawlessness. pic.twitter.com/pJ95mimP5a
— Trump’s Lies (Commentary) (@MAGALieTracker) April 5, 2025
डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सल्लागार एलॉन मस्क ज्या पद्धतीने देश चालवत आहेत, त्याचा नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या प्रशासनाने घेतलेल्या धोरणांचा विरोध करत निदर्शकांनी आर्थिक धोरणांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच काही निदर्शकांनी डोनाल्ड ट्रम्प आपल्याला जागतिक मंदीमध्ये ढकलतील, असंही म्हटलं आहे. दरम्यान, वृत्तानुसार, या आंदोलनामध्ये नागरी हक्क संघटना, कामगार संघटना, वकिल संघटनासह यूएसमधील १५० हून अधिक संघटना आणि हजारो अमेरिकन नागरिक तब्बल १२०० ठिकाणी रस्त्यावर उतरले आहेत. (Donald Trump)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community