अंत्ययात्रेला २०, लग्नाला १०० जणांची उपस्थिती, ‘निकाह’ मात्र तुडुंब गर्दीत! ठाकरे सरकारचा उफराटा न्याय

109

राज्यात सध्या कोरोनाचे निर्बंध लागू झाले आहेत. सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तर लग्न सोहळा आणि अंत्ययात्रेत उपस्थितांच्या संख्येत मर्यादा घालून देण्यात आली आहे. असे असेल तरी नेहमीप्रमाणे यंदाच्या लाटेतही मुस्लिम समुदायाला ठाकरे सरकारने विशेष सूट दिली आहे काय असा प्रश्न पडावा, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महापालिकेच्या जागेवरच कोरोना नियम धाब्यावर बसवले 

राज्य सरकारने वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. त्यामध्ये अंत्य यात्रेला २०, तर लग्न समारंभाला १०० जणांची उपस्थिती असावी, अशी मर्यादा घालून दिली आहे, तसेच विवाह सोहळे अत्यंत थोडक्यात व कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून करावेत, असे म्हटले आहे. याला दोन दिवसांपूर्वी मुस्लिम समुदायाचा विवाह सोहळा अर्थात निकाह अपवाद ठरला. अंधेरी पश्चिम येथील महापालिकेच्या शहाजी राजे क्रीडा संकुलात उच्चभ्रू मुस्लिम कुटुंबाचा विवाह सोहळा पार पडला, त्यावेळी हजारो मुसलमानांनी या निकाहला हजेरी लावली होती, तो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यावेळी महापालिका पथकाने घटनास्थळी येऊन दंड आकाराला, मात्र तेथील गर्दी कमी केली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान आम्ही याबाबत महापालिकेचे उपायुक्त प्रभात रहांगदळे त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अशा प्रकारे कोणतीही तक्रार आमच्याकडे आली नाही’, असे सांगितले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा निकाह तुडुंब गर्दीत झाला ते क्रीडा संकुल महापालिकेच्या मालकीचे आहे. तसेच त्याला सुरक्षा रक्षकही महापालिकेने नेमले आहेत. अशा वेळी जर निकाहला एवढी गर्दी होत आहे, हे सुरक्षा रक्षकांना लक्षात का आले नाही, असा प्रश्न उपस्थितीत निर्माण झाला आहे.

(हेही वाचा अखेर मनसेचे ‘हे’ स्वप्न झाले साकार!)

ठाकरे सरकारचा मुस्लिमांना एक आणि अन्य धर्मियांना दुसरा न्याय?

या ठिकाणी मोठ्या संख्येने लहान, वयस्क मंडळी हजर होती, ज्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता दाट आहे. त्यापैकी बहुतेकांच्या तोंडावर मास्क नव्हता, सामाजिक अंतराच्या नियमाचा फज्जा उडवला होता, या ठिकाणी तुडुंब गर्दी करण्यात आली होती. यामुळे पोलिस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी हे कोरोना निर्बंधांच्या वेळी अन्य धर्मियांच्या विवाह स्थळावर धाड टाकल्याप्रमाणे येतात, तिथे उपस्थितांची डोकी मोजतात, जर दिलेल्या मर्यादित संख्येपेक्षा जास्त संख्या दिसली, तर २० हजाराचा दंड ठोठावतात. ही मंडळी आधीच विवाहासारख्या आनंदी सोहळ्यात अशा धाडी टाकून रंगाचा बेरंग करतात, त्याउपर हजारोंचा दंड ठोठावून यजमानांना आणखी आर्थिक भुर्दंड पाडतात. अशी कारवाई ठाकरे सरकारला निकाहच्या ठिकाणी का करावीशी वाटली नाही, इथे जावून डोकी मोजून दंड ठोठावून निकाह थोडक्यात आटोपण्यास का भाग पाडले नाही? यावरून ठाकरे सरकार कोरोना निर्बंधांबाबत मुस्लिम धर्मियांना एक न्याय आणि अन्य धर्मियांना एक न्याय करत आहे का, असे दिसून येत आहे.

मागील दोन लाटांसह तिसऱ्या लाटेत मुस्लिमांना झुकते माप?

विशेष म्हणजे मागील दोन कोरोनाच्या लाटांच्या वेळीही ठाकरे सरकारने मुस्लिम समुदायाकडे दुर्लक्ष केले होते. राज्यात सर्वत्र कडक लॉकडाऊन होता, तरी भेंडीबाजार, बेहरामपाडा, मानखुर्द, गोवंडी, कुर्ला या मुस्लिम बहुल भागात दुकाने सुरू होती, लोक बिनदिक्कतपणे विना मास्क फिरत होते, उरुस भरवत होते, मिरवणुका काढत होते, लस घेण्यास टाळाटाळ करत होते, तिसऱ्या लाटेची सुरुवात होईल, अशी शक्यता बळावली असताना रझा अकादमीने ज्या विषयाशी महाराष्ट्राचा काडीमात्र संबंध नव्हता, त्या विषयावर राज्यभर पोलिसांनी परवानगी नाकारूनही मोर्चे काढले, हिंसक आंदोलने केली, जाळपोळ केली, असे असताना दुसरीकडे मात्र हिंदू आणि अन्य धर्मियांना लाठ्यांचा मार देत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.