बैरूतमध्ये मारल्या गेलेल्या हिजबुल्लाह प्रमुख नसरल्लाहच्या (Hassan Nasrallah) मृत्यूविरोधात भारतातही निदर्शने करण्यात आली आहेत. जम्मू-काश्मीरमधील (Jammu & Kashmir) बडगाममध्ये हिजबुल्लाहच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरले. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हसनाबाद, रैनावारी, सैदाकदल, मीरबिहारी आणि आशाबाग भागात लहान मुलांसह मोठ्या संख्येने लोक काळे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले. मात्र, आंदोलन शांततेत पार पडले.
Cancelling my campaign tomorrow in solidarity with the martyrs of Lebanon & Gaza especially Hassan Nasarullah. We stand with the people of Palestine & Lebanon in this hour of immense grief & exemplary resistance.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) September 28, 2024
तसेच जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री तथा पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे आगा सय्यद रुहुल्ला मेहदी यांनी हसन नसरल्लाहच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत एक दिवसांच्या निवडणुकीच्या प्रचार सभा रद्द केल्या आहेत. या संदर्भात मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्टही शेअर केली आहे. (Hassan Nasrallah)
मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात
निदर्शकांनी इस्रायल विरोधी आणि अमेरिकाविरोधी घोषणा दिल्या आणि लेबनानी दहशतवादी गटाच्या प्रमुख नेत्याच्या हत्येचा निषेध केला. या आंदोलनाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्या आगा रुहुल्ला यांनी आपला निवडणूक प्रचार रद्द करून आंदोलनात सहभाग घेतला, तर पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांनीही आपला प्रचार रद्द केला. (Hassan Nasrallah)