राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचा फोन आला आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी कुर्डुवाडी येथे दौऱ्यासाठी येऊ नये, असा इशारा पवारांना फोनवरून देण्यात आला. पण या फोननंतर देखील शरद पवारांनी नियोजित दौरा पूर्ण केला.
(हेही वाचा – Chandigarh University MMS Scandal: ‘आम्हाला सुरक्षित वाटत नाही’, चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींनी सोडले वसतीगृह)
मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीकडून पवारांना आज सकाळी कुर्डुवाडीमध्ये दौऱ्यासाठी येऊ नये, अशी धमकी देण्यात आली होती. मात्र तरीही ते न डगमगता कुर्डुवाडीच्या दौऱ्यावर होते. दरम्यान, फोन करणारी ही व्यक्ती कोण आहे, आणि त्याने ही धमकी का दिली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या धमकीच्या फोननंतर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई पोलीस कंट्रोल रूमला हा फोन आल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी या फोनची गंभीर दखल घेतली आहे. तर धमकी देणाऱ्या व्यक्तीचा नंबर रेकॉर्डवर आला आहे. या नंबरचा शोध पोलीस घेत आहेत. धमकीचा हा फोन सोलापूर वरून आल्याची माहिती असून या व्यक्तीचा आणि या प्रकरणाचा अधिक तपास हा पोलिसांकडून सुरू आहे.
Join Our WhatsApp Community