कांदेंना आली धमकी, भुजबळांनी काय केले? वाचा

नाशिकचे शिवसेना आमदार सुहास कांदे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यातील वाद सार्वजनिकरित्या पहायला मिळाला. नियोजन समितीची कामे आपल्या मर्जीतील ठेकेदारांना दिल्याचा आरोप करत शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे.

ही याचिका मागे घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या टोळीतील एका व्यक्तीने कांदेंना फोनवरुन धमकी दिल्याची माहिती कांदे यांनी दिली आहे. त्यामुळे यावरुन आता पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे. याबाबत भुजबळांनी मात्र हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत चौकशीचे आदेश दिले आहेत.

(हेही वाचाः हसन मुश्रीफ सोमय्यांना का म्हणाले, ‘हे वागणं बरं नव्ह!’)

भुजबळांचे चौकशीचे आदेश

मंगळवारी महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाचे आमदार सुहास कांदे यांना धमकी मिळाल्याचे पत्र त्यांनी नाशिक पोलिस आयुक्तांना दिले. त्याबाबत माहिती घेऊन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आमदार सुहास कांदे यांना आलेल्या धमकीचे प्रकरण गंभीर असून, तात्काळ दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांना दिले आहेत.

हे सहन करणार नाही

आमदारांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण अतिशय गंभीर असून, मंत्रीमंडळ बैठक सुरू असतानाच याबाबत माहिती मिळाली आणि आपण ही माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे, महाराष्ट्रात अशाप्रकारे कोणत्याही लोकप्रतिनिधीला धमकी देण्याचे प्रकार राज्य सरकार सहन करणार नसल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

(हेही वाचाः औरंगाबादमधून शिवसेना-भाजपाचे मनोमिलन होणार?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here