पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी

175

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. मोदींना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल मुंबईतील क्राईम ब्रँचच्या कार्यालयाला आल्याची माहिती गुप्तचर विभागातील सुत्रांनी दिली. या धमकीच्या मेलचा अधिक तपास करण्यात येत आहे.

काय आहे मेलमध्ये…

राष्ट्रीय तपास संस्थे (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) ला यासंदर्भात मेल आला असून यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इतकेच नाही तर, या कटाचा पर्दाफाश होऊ नये म्हणून आपण आत्महत्या करत आहे, असेही ईमेल करणाऱ्याने म्हटले आहे. या ईमेलनुसार, हल्ल्याची योजना तयार करण्यात आली असून ज्या व्यक्तीने हा मेल लिहिला आहे, त्याचे अनेक दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे मेलमध्ये म्हटले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने हा धमकीचा ई-मेल गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांनाही पाठवला आहे. ज्या मेल आयडीवरून हा मेल आला, त्याची बारकाईने तपासणी सुरू आहे. हा ईमेल राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबई शाखेला आला आहे.

(हेही वाचा – महागाई भत्ता तर मिळाला; राज्य सरकारी कर्मचारी म्हणतात जुन्या पेन्शनचे काय?)

मिळालेल्या माहितीनुसार, मोदी यांना मारण्यासाठी 20 स्लीपर सेल तयार आहेत. त्यांच्याकडे एकूण 20 किलो आरडीएक्स आहे. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर सेलकडून 20 किलो आरडीएक्सच्या सहाय्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचला जात होता. पंतप्रधान मोदींच्या हत्येच्या कटासंदर्भातील ई-मेलचा स्रोत काय? याची माहिती संरक्षण संस्था मिळवत आहेत. तसेच, या नापाक इराद्याने दहशतवादी संघटनांनी 20 स्लीपर सेल तयार केल्याचेही, संस्थांचे म्हणणे आहे.

पहिल्यांदाच नाही तर यापूर्वीही मिळाली होती धमकी

पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी ही पहिल्यांदाच मिळाली नाही तर सप्टेंबर 2021 मध्ये धमकी मिळाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी ट्विटरवरुन मिळाली होती. दीपक शर्मा नावाच्या ट्विटर खात्यावरुन धमकी देण्यात आली होती. याशिवाय जून 2021 मध्ये 22 वर्षीय तरुणाने पोलिसांना फोन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचेही सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.