काँग्रेसला तब्बल दहा वर्षांनंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद लाभले आहे. मात्र, राज्यसभेतील विरोधीतील विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. काँग्रेसच्या दोन खासदारांनी राजीनामा दिला किंवा पक्षांतर केले तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना विरोधीपक्षनेत्याच्या पदावरून पायउतार व्हावे लागेल. (Congress)
देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष काँग्रेसच्या विरोधीपक्ष नेतेपदामागचे शुक्लकाष्ठ संपण्याचे नाव घेण्याचे नाव घेत नाही आहे. तब्बल दहा वर्षानंतर काँग्रेसला लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळाले. मात्र, दुसरीकडे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते धोक्यात येण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यसभेतील काँग्रेसच्या खासदारांची संख्या घटली आहे. ही संख्या दोनने घटली आहे. (Congress)
काँग्रेसने राज्यसभेचे खासदार आणि संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि दीपेंदर हुडा यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरविले होते. हे दोन्ही नेते विजयी झाले आहेत. यामुळे राज्यसभेतील खासदारकीचा त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. यामुळे काँग्रेसचे संख्याबळ २६ वर आले आहे. थोडक्यात काय तर, लोकसभेतील यशामुळे राज्यसभेतील विरोधी पक्षांचे समीकरण बिघडले आहे. (Congress)
लोकसभा निवडणुकीत राज्यसभा सदस्यांच्या विजयानंतर आसाम, बिहार आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन आणि मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि त्रिपुरामधील प्रत्येकी एक अशा एकूण १० जागा रिक्त झाल्या आहेत. यापैकी सात खासदार भाजपाचे, दोन काँग्रेस आणि एक राष्ट्रीय जनता दलाचा आहे. भाजपाच्या सात जागा पुन्हा निवडून येणार आहेत. तर काँग्रेस आणि आरजेडीला तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. (Congress)
(हेही वाचा – Crime : पत्नीची दहशत; बँकॉक वारी लपवण्याच्या नादात पतीला तुरुंगवारी)
भाजपा सर्वात मोठा पक्ष
सध्याच्या सांख्यिकीय स्थितीनुसार, ९० सदस्यांसह भाजपा हा सर्वात मोठा पक्ष आहे. यानंतर काँग्रेस २६, तृणमूल काँग्रेस १३ आणि वायएसआर काँग्रेस ११ वर आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणत्याही पक्षाला किमान पात्रता पूर्ण करावी लागते. नियमानुसार विरोधी पक्षनेतेपदासाठी किमान २५ खासदार असणे आवश्यक आहे. काँग्रेसचे २६ खासदार असल्यामुळे सध्या हे पद काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे आहे. (Congress)
काँग्रेसची सदस्य संख्या ही आवश्यक खासदारांपेक्षा फक्त एकने जास्त आहे. अशात, दोन खासदारांनी पक्षांतर केले किंवा राजीनामा दिला तर काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येऊ शकते. मात्र, रिक्त झालेल्या दहा जागांवर निवडणूक होणे आहे. यात भाजपाचे सात आणि काँग्रेस तसेच अन्य पक्षाचे तीन खासदार निवडून येण्याची शक्यता आहे. वेणुगोपाल राजस्थानमधून तर हुडा हरियाणातून राज्यसभेवर निवडून गेले होते. या दोन्ही राज्यात काँग्रेस आमदारांची संख्या गरजेएवढी आहे. मात्र, निवडणुकीत मते फुटण्याचा प्रकार एवढ्यात जास्त बघायला मिळतो आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची मते फुटली. याची पुनरावृत्ती हरियाणा आणि राजस्थानमध्ये झाले तर विरोधी पक्षनेतेपद नक्कीच धोक्यात येऊ शकते. (Congress)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community