पीएफआयवरील बंदीनंतर हिंदुत्ववादी नेत्यांना धमकीचे फोन

166

केंद्र सरकारने पीएफआय संघटनेवर बंदी घातल्यानंतर पीएफआयशी संबंधित लोकांचा पोटशूळ वाढला आहे. त्यामुळे पीएफआय कार्यकर्त्यांकडून हिंदुत्ववादी नेत्यांना धमकी देण्यात येत आहे. दिल्लीतील प्रखर हिंदुत्ववादी नेते कॅप्टन सिकंदर रिझवी यांना अशाच काही समाजकंटकांकडून धमकी देण्यात आली आहे.

माध्यमांमध्ये पीएफआयविरोधी चर्चांमध्ये सहभाग घेतल्यामुळे रिझवी यांना ही धमकी देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान सिकंदर रिझवी यांनी नवी दिल्लीतील चित्तरंजन पार्क पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास कॅप्टन रिझवी यांना एका अज्ञात नंबरवरुन फोन आला. या फोनवरुन एका अज्ञात इसमाने शिवीगाळ करत 24 तासांत जीवे मारण्याची धमकी रिझवी यांना देण्यात आली. याबाबत रिझवी यांनी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

तक्रार अर्ज दाखल

मी गेली 30 वर्षे अयोध्येतील राम मंदिरासाठी चाललेल्या आंदोलनात सहभागी असून मी राष्ट्रवादी विचारांचा माणूस आहे. जम्मू-काश्मीरमधील वादग्रस्त कलम 370 आणि 35ए हटवण्यासाठी सुद्धा मी आवाज उठवला होता. तसेच सीएए,तीन तलाक बंदी आणि एनआरसी लागू करण्यासाठी देखील विविध माध्यमांमधून आपले मत मी प्रकट केले होते. गेल्या काही दिवसांपासून मी पीएफआयवर बंदी घालण्यासाठी माध्यमांमध्ये आपले मत मांडत होतो.

त्यामुळे जिहादी आणि पीएफआय सारख्या आतंकवादी संघटनांशी संबंध असलेल्या लोकांनी मला लक्ष्य केले आहे. त्यामुळे आज मला आलेल्या धमकीमुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे अशा अपराध्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी कॅप्टन सिकंदर रिझवी यांनी तक्रार करत केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.