गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा या भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर आता दिंडोरी तालुक्यातील काही भागांना भूकंपाचे तीन धक्के बसल्याचे जिल्हा अपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील विविध गावांना हे धक्के मंगळवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणावले आहेत.
(हेही वाचा – लता दीदींच्या जयंती दिनी आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय होणार सुरू)
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या मेरी येथील भूकंप यंत्राच्या अहवालानुसार, रात्री 8 वाजून 58 मिनिटांनी, 09 वाजून 34 मिनिटांनी आणि 09 वाजून 42 मिनिटांनी असे तीन भूकंपाचे धक्के जाणवले. या सौम्य धक्क्यांची तीव्रता अनुक्रमे 3.4, 2.1 आणि 1.9 असून नाशिक वेधशाळेपासून 16 ते 20 किलोमीटर अंतरावर दिंडोरी तालुक्यामध्ये असण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हा अपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने माहिती दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी शहर, मडकीजांब, हातनोरे, निळवंडी, जांबुटके, उमराळे, तळेगाव येथे भूकंपाचे धक्के बसले आहे. त्यामुळे या गावातील लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर काहीतरी आवाज होऊन जमिनीला हादरे बसल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. तर या परिसरातील सर्वात जास्त हादरे जांबुटके गावात बसले असल्याचे सांगण्यात येत आहेत.
Join Our WhatsApp Community