राज्यात भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली आहे. यामध्ये विविध मंत्री आणि नेत्यांची एक यादीच त्यांनी तयार केली असून, या यादीत आता आणखी तीन मंत्र्यांचा समावेश होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या मंत्र्यांची नावे त्यांनी गुलदस्त्यात ठेवली आहेत, पण तरीही ते कोण आहेत याकडे त्यांनी इशारा केला आहे. सध्या किरीट सोमय्या राजधानी दिल्लीत ईडी, सीबीडीटीच्या अधिका-यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत.
कोण आहेत ते नेते?
आपण महाविकास आघाडी सरकारमधील तीन मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी काम करत असून, लवकरच त्यांची नावे जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये विदर्भातील काँग्रेसचे मंत्री, राष्ट्रवादीचा मोठा नेता आणि एका शिवसेना नेत्याचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या नेत्यांच्या कुटुंबीयांचा सुद्धा या घोटाळ्यामंध्ये सहभाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुश्रीफांविरोधात पुरावे
राज्याचे ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात 2700 पानांचा पुरावा असलेली फाईल घेऊन दिल्लीत पोहोचले आहेत. ईडीकडे त्यांनी ही फाईल सुपूर्द केली आहे. या प्रकरणी निश्चितच कारवाई करण्यात येईल, असा विश्वास सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community