गोवा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडले. तिन्ही राज्यांमध्ये झालेल्या मतदान प्रक्रियेला मतदारांचा फारसा प्रतिसाद पहायला मिळाला नाही. गोवा आणि उत्तराखंडमध्ये पहिल्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी तर उत्तर प्रदेशात दुस-या टप्प्यासाठी सोमवारी मतदान पार पडले. यावेळी गोव्यात सरासरी 76 टक्के, उत्तराखंडमध्ये 61 आणि उत्तर प्रदेशात सरासरी 62 टक्के मतदान झाले.
इतके उमेदवार रिंगणात
उत्तर प्रदेशमधील दुसऱ्या टप्प्यातील, तर उत्तराखंड आणि गोव्यातील सर्व विधानसभा जागांसाठी मतदान झाले. तिन्ही राज्यांत मिळून एकूण 165 जागांसाठी मतदान झाले. यासाठी 1 हजार 519 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यूपीमधील 55 विधानसभा जागांसाठी 586 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असून, उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी 632 आणि गोव्यातील 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात आहेत.
(हेही वाचाः कोकणात पुन्हा सेना-भाजपमध्ये राडा! काय आहे कारण?)
असे झाले मतदान
उत्तर प्रदेशात 55 मतदारसंघात 2 कोटी 20 लाख, उत्तराखंडमध्ये 81 लाख 43 हजार 922 आणि गोव्यात 11 लाख मतदाते आहेत. यापैकी गोव्यात सरासरी 76 टक्के, उत्तराखंडमध्ये सरासरी 61 आणि उत्तरप्रदेशातील 55 जागांवर सरासरी 62 टक्के मतदान झाले आहे.
शंभर नंबरी मतदाता
उत्तराखंडमध्ये 100लटक्के मतदान झाले नसले तरी, एका 100 वर्षाच्या वृद्धाने मात्र मतदानाचा हक्क बजावला. लाल बहादूर असे या ज्येष्ठ मतदाराचे नाव असून त्यांनी राज्यातील सहसपुर विधानसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. सशक्त लोकशाहीसाठी सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
(हेही वाचाः भाजपच्या साडे तीन नेत्यांआधी शिवसेनेचा ‘हा’ नेता जाणार तुरुंगात! काय आहे आरोप?)
Join Our WhatsApp Community