लोकसभा निवडणुका अवघ्या २ ते ३ महिन्यांवर आलेल्या असतांना काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ‘भारत न्याय यात्रा’ (Bharat Nyaya Yatra) काढली आहे. या यात्रेवर टीकाच अधिक होत आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी राहुल गांधींच्या या यात्रेवरून व काँग्रेसच्या नेतृत्व निवडीवरून निशाणा साधला आहे.
(हेही वाचा – Imran Khan: इमरान खान आणि पत्नी बुशरा बीबी यांना १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा)
ते जाहीरपणे मान्य करत नाहीत
एकीकडे राहुल गांधी मणिपूरमधून भारत न्याय यात्रेतून सामान्य मतदारांशी संवाद साधत असतांना ‘भारत न्याय यात्रा काढण्याची ही सर्वांत चुकीची वेळ आहे’, अशी टिप्पणी प्रशांत किशोर यांनी केली आहे.
“राहुल गांधी जर स्वत: काँग्रेस चालवत नसतील, तर त्यांनी हे सांगितले पाहिजे की, ते काँग्रेस (Congress) चालवत नाहीत. पण समस्या ही आहे की, ते काँग्रेस चालवत आहेत आणि ते हे जाहीरपणे मान्य करत नाहीत. यात्रेसाठी ही चुकीची वेळ आहे. यात्रा ६ महिने किंवा वर्षभरापूर्वीच काढली जायला हवी होती”, असे प्रशांत किशोर म्हणाले.
(हेही वाचा – BMC Budget २०२४-२५ : महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या शुक्रवारी २ फेब्रुवारीला; यंदाचा अर्थसंकल्प तुटीच्या आसपास)
हा धोरणात्मक कॉमन सेन्स
प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, आता तुमच्या मित्रपक्षांच्या भेटीगाठी करणे, साधनांची जुळवाजुळव करणे, तुमचे उमेदवार ठरवणे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमची मुख्यालयात गरज आहे. त्या वेळी तुम्ही रस्त्यावर उतरून यात्रा करत आहात. जेव्हा तुम्ही रस्त्यावर उतरायला हवे होते, तेव्हा तु्म्ही दिल्लीत होतात. मला माहिती नाही की, त्यांना कोण सल्ले देत आहे. हा धोरणात्मक कॉमन सेन्स आहे.
निर्णय न घेतल्यामुळे काँग्रेसचे नुकसान
“राहुल गांधींकडे (Rahul Gandhi) स्पष्टता असायला हवी. काँग्रेस किंवा विरोधकांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत स्पष्ट धोरण जाहीर करायला हवं. मग ते राहुल गांधी असोत किंवा मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) असोत. निर्णय न घेतल्यामुळे काँग्रेसचे नुकसान होत आहे. जर राहुल गांधींना पंतप्रधान व्हायचे नसेल, तर त्यांनी स्वत: ते जाहीर करायला हवे. पण राहुल गांधी हे सांगत नाहीत”, असेही प्रशांत किशोर म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community