मालाडच्या त्या क्रीडांगणावरील टिपू सुलतानच्या नावाची पाटी कायमच

138

मालाड पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ३० मधील एका खेळाच्या मैदानाला वादग्रस्त टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या वादानंतरही या नावाची पाटी आजही कायम आहे. महाविकास आघाडीच्या काळात पालकमंत्री अस्लम शेख यांनी या उद्यानाचे नुतनीकरण करत याचे नाव टिपू सुलतान असे केल्यानंतर याला सर्व पक्षांनी जोरदार विरोध केला होता. परंतु राज्यात महाविकास आघाडी जावून शिंदे फडणवीस यांचे सरकार आल्यानंतरही या टिपू सुलतानच्या नावाची पाटी या उद्यानाच्या प्रवेशद्वारावरून हटवण्यात आलेली नाही.

( हेही वाचा : T20 Final : इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान मॅचच्या २४ तास आधी ICC ने केला गेमचेंज; पाऊस पडला तर कोण जिंकणार? )

उत्तरमुंबईतील मालाड मालवणातील एका मैदानाचे नुतनीकरण जानेवारी २०२२मध्ये तत्कालिन मंत्री अस्लम शेख यांनी आमदार निधीतून केले. त्यानंतर या क्रीडांगणाचे नाव शेख यांनी टिपू सुलतान उद्यान असे बेकायदेशीर असे केले आणि कुठल्याही विभागाची परवानगी न घेता ही पाटी लावली. त्यामुळे या विरोधात प्रथम भाजप आणि त्यानंतर शिवसेना पक्षाने तीव्र विरोध केला होता. याविरोधात जोरदार आंदोलनही करण्यात आली होती. परंतु तत्कालिन सरकारने याप्रकरणाला गांभिर्याने न घेता हे नाव कायमच ठेवले. मात्र, आधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या दबावामुळे जिल्हाधिकारी यांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नाही.

मात्र, राज्यात सत्ता पालट झाल्यानंतरही आजही या क्रीडांगणाचे नाव टिपू सुलतान असून राज्यात हिंदुत्ववादी पक्षांचे सरकार येवूनही या नावाची बेकायदा पाटी अद्यापही हटवण्यात आलेली नाही. भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी ही जागा महाराष्ट्र शासनाची असून या क्रीडांगणाचे नामकरण शासकीय भूखंडावरील नामकरणाच्या वेळी संबंधित शासकीय विभागाकडे प्रस्तावही मांडला नव्हता.शिवाय आवश्यक एकही परवानगी न घेा आमदार अस्लम शेख यांनी बेकायदेशी नामकरण केले होते. याला आमचा विरोध होता आणि आहे. या प्रकरणात आंदोलन करणारे काहीजण तुरुंगातही गेले होते. मंत्री असताना अस्लम शेख यांनी शांती भंग करणारे कृत्य केले असून शासकीय यंत्रणांवर दबाव आणून त्यांनी हे कृत्य केले होते. परंतु आजमितीस या बेकायदा नामकरण करत लावलेला टिपू सुलतान यांच्या नावाचा फलक कायम असून हा फलक हटवण्यासाठी उपनगराचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना आपण ७ नोव्हेंबर २०२२ रोजी पत्र लिहून ही मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. खासदार गोपाळ शेट्टी यांनी “मालाड पश्चिम मालवणी येथील उद्यानाचे नामकरण टिपू सुलतान बदलावे, पाटी काढून घेण्यास त्वरित कारवाई करावी आणि संबंधित विभागांना दिशा निर्देश द्यावे तसेच महापालिका आयुक्त यांना ही कळवावे” अशी विनंती पत्राद्वारे केली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.