मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, मात्र याचं आर्थिक राजधानीत लोकसंख्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या संदर्भाताच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या अभ्यास अहवालात मोठे खुलासे करण्यात आले आहेत. टीसीएसने दिलेल्या अहवालानुसार, मुंबईतील हिंदू लोकसंख्या २०५१ सालापर्यंत ५४ टक्के कमी होईल. तसेच बांगलादेशी आणि रोहिग्यांची संख्या ही मुंबईत वाढेल, असे अहवालातून स्पष्ट होत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या अहवालाची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.(TISS)
मुंबईतील लोकसंख्येच्या बदलाची आकडेवारी
भारतातील सुप्रसिद्ध सामाजिक विज्ञान संस्था आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या (TISS) या अहवालानुसार, १९६१ मध्ये मुंबईत हिंदूंची लोकसंख्या ८८% होती, जी २०११ मध्ये ६६% झाली. त्याचदरम्यान, मुस्लिम लोकसंख्या १९६१ मध्ये ८% वरून २०११ मध्ये २१% पर्यंत वाढली आहे. त्यामुळे मुस्लिम लोकसंख्येत गेल्या ५० वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार TISSने असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, २०५१ पर्यंत हिंदू लोकसंख्या ५४% कमी होईल आणि मुस्लिम लोकसंख्या सुमारे ३०% वाढेल. (TISS)
झोपडपट्ट्यांमध्ये रोहिंग्यांची संख्या वाढेल!
याबाबतीत भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, २०५१ पर्यंत गोवंडी, मानखुर्दे, धारावी आणि कुर्ला या झोपडपट्ट्यांमध्ये रोहिंग्यांची संख्या ही वाढेल. तर हिंदूंची संख्या ५४ टक्क्यांपर्यंत येईल. त्यामुळे मुंबईच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर याचा परिणाम होत आहे. तसेच मराठा मुस्लिम सेवा संघ आणि अशा ४०० संस्था मुस्लिमांना व्होट जिहादसाठी भडकवत आहेत. धार्मिकस्वयंसेवी भावनांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे दंगली होऊ शकतात, असे ही सोमय्या म्हणाले. (TISS)
बांगलादेशी-रोहिंग्या स्थलांतरितांच्या संख्येत वाढ
दरम्यान TISS च्या अहवालानुसार, बांगलादेश आणि म्यानमारमधून अवैध घुसखोरांची वाढती संख्या, विशेषत: बांगलादेशी आणि रोहिंग्या समुदायातील लोकसंख्या मोठ्या वेगाने वाढत आहे. यात बांगलादेशी हे घुसखोर प्रामुख्याने झोपडपट्टी भागात स्थायिक होत आहेत, ज्यामुळे शहराच्या पायाभूत सुविधांवर ताण वाढत आहे. त्यामुळे TISS चा अभ्यास अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत. त्याच वेळी, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हा अहवाल पूर्णपणे खरा आणि अचूक असल्याचे म्हणत हे अवैध घुसखोर मुंबई शहरासाठी गंभीर धोका आहे, असे सोमय्या म्हणाले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community