ममता दिदींचे पवारसाहेबांना पत्र! बंगाल निवडणुकीत काय आहे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका?

देशातील इतर भाजप विरोधी पक्षांच्या नेत्यांबराबरच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहीले आहे. त्यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी पक्षाची बंगाल निवडणुकांबाबत असलेली भूमिका स्पष्ट केली आहे.

बंगालमधील विधानसभा निवडणुकांचे वारे सध्या जोरदार वाहत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि भाजपकडून अमित शहांपासून मोदींपर्यंत सर्वांनी प्रचारात आपली ताकद दाखवून दिली. २७ मार्च ते २९ एप्रिल अशा काळात ८ टप्प्यांमध्ये या निवडणुका पार पडणार आहेत. पण आता याच निवडणुकांच्या धामधुमीत ममता दिदींनी एक वेगळी योजना आखली आहे. देशातील इतर भाजप विरोधी पक्षांच्या नेत्यांबराबरच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहीले आहे. त्यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी पक्षाची बंगाल निवडणुकांबाबत असलेली भूमिका स्पष्ट केली आहे.

दिदींना पवरांचा पाठिंबा

तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील विरोधी पक्षाच्या अध्यक्षांना समर्थन देण्याबाबत पत्रव्यवहार केला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनाही हे पत्र प्राप्त झाले आहे. आमच्या पक्षाचा ममताजींना पाठिंबा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

(हेही वाचाः शिवसेनेत ‘आदित्य’शाही, बाहेरुन आलेल्यांसाठी अंथरली ‘सतरंजी’!)

शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला पवार जाण्याची शक्यता

शरद पवार यांचा १ ते ३ एप्रिल असा पश्चिम बंगालचा दौरा होता. पण त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना जाता येणार नाही. मात्र पवारसाहेबांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाल्यास शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला पश्चिम बंगालला जातील, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. दरम्यान शरद पवार यांच्या पित्ताशयावर ३० मार्च रोजी रात्री शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. तसेच त्यांच्या पित्ताशयावर आठ ते दहा दिवसांत पुन्हा एक शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here