अयोध्येतील राम मंदिर हे केवळ ‘शो पीस’आहे. हे मंदिर अपवित्र आहे. कुठल्याही हिंदूंनी तिथे पूजा करू नये, असे बेताल वक्तव्य तृणमूल काँग्रेसचे आमदार रामेंदू रॉय (TMC leader’s Offensive Statement) यांनी एका जाहीर सभेत केले. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून रॉय याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालच्या तारकेश्वर मतदारसंघाचे आमदार आणि आरामबाग जिल्ह्यातील टीएमसीचे जिल्हा अध्यक्ष रामेंदू सिन्हा रॉय एका जनसभेत म्हणाले की, अयोध्येतील राम मंदिर अपवित्र असून केवळ ‘शो पीस’आहे. हिंदूंनी तिथे जाऊन पूजा करू नये. त्यांच्या या बेताल विधानामुळे जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे. भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे, तर भाजपचे आमदार बिमान घोष यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शुभेंदू अधिकारी यांनी रामेंदू रॉय यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : आता MMRDA क्षेत्रातही डीप क्लिन ड्राईव्ह – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
भाजपाच्या अधिकाऱ्यांकडून जाहीर निषेध
भाजपचे प्रदेशाध्यक्ष शुभेंदू अधिकारी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून रामेंदू यांच्या विधानाचा निषेध केला आहे. आपल्या पोस्टमध्ये अधिकारी म्हणाले की, ‘ही टीएमसी नेत्यांची भाषा आहे. तृणमूल काँग्रेसचे नेतृत्व प्रभू रामचंद्रांचा किती आदर करते हेच त्यांनी दाखवून दिले आहे. मी केवळ त्यांच्या वक्तव्याचा निषेधच करणार नाही, तर जगभरातील हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या या वक्तव्याबद्दल तक्रारही दाखल केल्याचे अधिकारी यांनी सांगितले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community