‘इन्क्विझिशन’च्या अत्याचारांची माहिती देण्यासाठी लवकरच ‘गोवा फाईल्स’!

137

भगवान परशुराम ही देवता गोव्याचे रक्षण करते. गोव्याच्या काळ्या इतिहासातील ‘इन्क्विझिशन’ला कथित संत फ्रान्सिस झेवियर हाच कारणीभूत होता. त्यामुळे गोव्यात 250 हून अधिक वर्षे ‘इन्क्विझिशन’च्या माध्यमातून केलेल्या जुलमी अत्याचारांची सत्य माहिती नव्या पिढीला देणे आवश्यक आहे. यासाठीच ‘गोवा फाईल्स’चा दुसरा भाग गोमंतकीयांच्या समोर ठेवणार आहे, असे प्रतिपादन गोवा येथील ‘भारत माता की जय संघा’चे राज्य संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले. ‘हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या एकतेचा यशस्वी प्रयोग : हिंदु रक्षा महाआघाडी’, या विषयावर ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर स्वामी आत्मस्वरूपानंद महाराज, पू. परमात्माजी महाराज, धारवाड, कर्नाटक, तसेच सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस हे उपस्थित होते.

गोव्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्याचे धाडस

प्रा. सुभाष वेलिंगकर पुढे म्हणाले, गोवा येथे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांची घुसखोरी वाढलेली आहे. गोव्यातील अनेक ठिकाणांचा ताबा मुसलमानांनी घेतला आहे. गोवा येथे ‘पॉप्युलर फ्रंट इंडिया’ (PFI) ही कट्टर इस्लामिक संघटना सक्रिय झाली आहे. गोव्यातील धर्मांध मुसलमान मुख्यमंत्र्यांना चेतावणी देऊन ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्याचे धाडस करू लागले आहेत. या सर्व गोष्टींचा सामना करण्यासाठी हिंदु समाजाचे संघटन करणे आवश्यक आहे. त्यासाठी गोवा येथील लहान-मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या 350 प्रतिनिधींना घेऊन आम्ही हिंदु रक्षा महाआघाडीची स्थापना केली आहे. धर्मांतराचा विरोध, जिहादचा विरोध, मंदिर सुरक्षा, धर्मशिक्षण, अशी पंचसूत्री सिद्ध करून त्यानुसार कार्य करण्यात येत आहे. गोवा राज्यातील सर्व संस्था स्वतःचे कार्य करत असतांना या पंचसूत्रींचा त्यांच्या कार्यप्रणालीत अंर्तभाव करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.