मंत्रिमंडळात गँगवॉर सुरु असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले असून त्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी मंत्रिमंडळातील गँगवॉर सिध्द करावे, आम्ही राजीनामे देऊ असे आव्हान हसन मुश्रीफ यांनी केले. (Hasan Mushrif)
संजय राऊत म्हणतात असा कोणताही वाद मंत्रिमंडळात झाला नाही. सगळ्याच मंत्र्यांनी संयमाने बोलावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत सांगितले आहे. मंत्री एकमेकांच्या अंगावर धावून गेले वगैरे असे काही झाले नाही. संजय राऊत सिद्ध करु शकले तर आम्ही मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे मुश्रीफ म्हणाले. (Hasan Mushrif)
(हेही वाचा – Cache For Query Case : महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ; खासदारकी धोक्यात)
छगन भुजबळ यांनी आरक्षणाप्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावरही मुश्रीफांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावे, अशी सर्वांचीच मागणी आहे. त्यामुळेच सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केले आहे. ज्यांना कुणबी दाखले आहेत त्यांना ओबीसी आरक्षण द्यावे, असे भुजबळ देखील बोलले आहेत. त्यामुळे कोणताही वाद नाही. कुणीही गैरसमज करुन घेऊ नये, असेही मुश्रीफ म्हणाले. (Hasan Mushrif)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community