‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’ ही कोटीत!

106

मुंबई महानगरपालिकेच्या विविध सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी  १४ जानेवारी‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’द्वारे जनतेला ८० हून अधिक सुविधा घर बसल्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.‘आपली मुंबई, माझी मुंबई’ साठी कार्यरत असणा-या देशातील क्रमांक एकच्या महानगरपालिकेद्वारे ही सुविधा ८९९९-२२-८९९९ या क्रमांकाद्वारे नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेसाठी महापालिकेनं इन्फोबीफ लिमिटेड कंपनीसोबत सांमजस्य करार केला असून, वर्षभराकरता १ कोटी ६२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

म्हणून ‘ही’ सुविधा 

मागील १४ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते व्हॉट्सअप चॅटबॉटचे लोकार्पण करण्यात आले असून, याद्वारे मुंबईतील जनतेला ८० हून अधिक सुविधा मिळणार आहे. दैनंदिन आयुष्यात व्हॉट्सअप प्रणालीचा वापर बहुतांशी नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे या प्रणालीचा वापर संवादाकरता मर्यादित राहिलेला नसून, या प्रणालीद्वारे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक व्यवहारही करण्यात येत आहेत. तसेच इंटेलिजंट व्हर्च्युअल असिस्टंट हे तंत्रज्ञान व व्हॉट्सअप प्रणाली यांमध्ये एकात्मता साधून त्यांचा उपयोग केला जातो. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या आधारे व्हॉट्सअप चॅटबॉट ही सुविधा तयार करण्यात आली आहे.

( हेही वाचा: स्वामी यतिंद्रानंद गिरी म्हणाले…’द काश्मीर फाइल्स’चा भाग-2 बनवा! )

‘या’ कंपनीशी करार

या प्रणालीचा वापर प्रायोगिक तत्वावर करण्यासाठी इन्फोबीप लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली असून, ही कंपनी व्हॉट्सअपची अधिकृत सेवा पुरवठादार कंपनी आहे. त्यामुळे फेब्रुवारी २०२३ पर्यंत एक वर्षाकरता ही सेवा घेण्यात आली असून या एका वर्षांच्या सेवेकरता १ कोटी ६० लाख ७१ हजार रुपये अदा केले जाणार आहेत.

‘या’ सेवांचा समावेश

यामध्ये चॅटबॉटवर माहिती प्रदर्शित करणे, तक्रारी निवारणानंतर नागरिकांना तक्रारीत ठिकाणांची प्रतिमा पाठवून सुचित करणे,  नागरिकांना विवाह नोंदणी तसेच तक्रार निवारणासाठी वॉर्ड अधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन  नागरिकांची भेट घडवून व्हिडीओ केवायसी सुविधा देणे, ऍक्वा, सीव्हीएस इत्यादी ऑनलाईन सेवांव्यतिरिक्त इतर सेवा देणे, आरोग्य सेवांमध्ये रक्तपेढी, बीएमसी रुग्णालयांसाठी ओपीडी अपॉइंटमेंट, कार्यक्षम सेवा पुरवण्यासाठी ऍनलिटीकल डॅशबोर्ड आदी सेवांचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.