पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच आपल्या संविधानाच्या भावनेनुसार कायदे बनवले जाणार आहेत. दीडशे वर्षांनंतर हे तीन कायदे बदलल्याचा मला अभिमान आहे. काही लोक म्हणायचे की, आपण या कायद्यांना समजून घेतले पाहिजे, मी त्यांना सांगतो की, तुम्ही भारतीय म्हणून मन ठेवले तर तुम्हाला समजेल. पण, जर तुमचे मन इटलीचे असेल तर तुम्हाला कधीच समजणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) म्हणाले.
दहशतवादाची व्याख्या प्रथमच केली
ब्रिटिशकालीन कायद्यांमध्ये कुठेही दहशतवादाची व्याख्या नव्हती. पहिल्यांदाच मोदी सरकार दहशतवादाची व्याख्या कायदेशीर भाषेत केली आहे. ही इंग्रजांची राजवट नाही, ही काँग्रेसची राजवट नाही, ही भाजपा आणि नरेंद्र मोदींची राजवट आहे. दहशतवाद वाचवण्याचा कोणताही युक्तिवाद इथे चालणार नाही, असे अमित शाह (Amit Shah) म्हणाले. लोकसभेत भारतीय न्याय संहिता (द्वितीय सुधारणा) (एनबीएस-२०२३), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (द्वितीय सुधारणा) (बीएनएसएस-२०२३) व भारतीय साक्ष (द्वितीय सुधारणा) (बीएस-२०२३) अशी तीन विधेयके सादर केली. या तीनही विधेयकांना यापूर्वीही सादर केले गेले होते, मात्र खासदारांनी त्यात अनेक बदल सुचविल्यामुळे या कायद्यांना संशोधनासाठी संसदीय समितीकडे पाठविण्यात आले होते. आता पुन्हा एकदा लोकसभेत हे कायदे सादर करून त्यावर सभागृहाची मंजुरी घेण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community