आजचा भारत घरात घुसून मारतो; पण काँग्रेस…; PM Modi यांचा हल्लाबोल; सर्जिकल स्ट्राईकला ८ वर्षे पूर्ण

175
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शनिवार, २८ सप्टेंबर रोजी जम्मूमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना हुतात्मा भगतसिंग यांना आदरांजली वाहिली. तसेच आपल्या भाषणात २०१६ च्या सर्जिकल स्ट्राईकची आठवण करून दिली. आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक झाला. भारताने जगाला दाखवून दिले होते की, हा नवा भारत आहे, जो घरात घुसून मारतो. पण काँग्रेस सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत आहे, आजही काँग्रेस या मुद्द्यावर पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचे हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  (PM Modi) काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीवर जोरदार निशाणा साधला आहे. जम्मू-काश्मीरमधील लोक या तीन घराण्यांच्या राजकारणाला कंटाळले आहेत. येथील लोकांना आता दहशतवाद, फुटीरतावाद आणि रक्तपात नको आहे. त्यांना त्यांच्या मुलांचे चांगले भविष्य आणि शांतता हवी आहे. त्यामुळेच लोक भाजपा सरकारला पाठिंबा देत आहेत. जम्मू-काश्मीरमधील लोकांचा मूड भाजपाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
इतिहासात यापूर्वी कधीही अशी संधी मिळाली नाही, जी या निवडणुकीत आली आहे. पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमधील लोकांच्या इच्छेनुसार सरकार स्थापन होणार आहे. ही संधी महत्त्वाची असून ती गमावू नये. भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर जम्मूतील जनतेचं सर्व दुःख दूर करू, असेही पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.