- प्रतिनिधी
दिल्ली निवडणुकीमध्ये जनतेचा चांगला प्रतिसाद मिळावा, यासाठी काँग्रेसच्यावतीने राजधानीत दिल्ली न्याय यात्रा काढण्यात आली होती. मात्र या यात्रेत सहभागी होणे तर सोडाच काँग्रेस नेत्यांचे मनोबल वाढावे यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याकडून काहीच प्रयत्न करण्यात आले नसल्याने पक्षातील नेते राहुल गांधी यांच्यावर नाराज असल्याची चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात रंगली आहे.
(हेही वाचा – Kurla Bus Accident प्रकरणातील मृत आणि जखमींच्या नावाची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर !)
काँग्रेसच्या दिल्ली न्याय यात्रेची शनिवारी सांगता झाली. मात्र, महिनाभर चाललेल्या त्या यात्रेत पक्षाच्या केंद्रीय नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. दिल्लीतील विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. ती निवडणूक विचारात घेऊन जनतेपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशातून काँग्रेसच्या दिल्ली शाखेने न्याय यात्रेचे आयोजन केले. पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या धर्तीवर दिल्लीतील यात्रेचे आयोजन करण्यात आले. त्या यात्रेचा प्रारंभ ८ नोव्हेंबरला झाला. संबंधित यात्रेत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आदी नेते सहभागी झाले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीविषयी पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांनी स्पष्टीकरण दिले.
(हेही वाचा – Durgadi Fort : हिंदूंच्या प्रदीर्घ लढ्याला यश; कल्याणमधील दुर्गाडी हे देवीचे मंदिरच; न्यायालयाचा निर्वाळा)
महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांत नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. त्याशिवाय, पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी उमेदवार असणाऱ्या वायनाडमध्ये पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकांच्या प्रचारात केंद्रीय नेते व्यस्त होते. त्याशिवाय, सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे केंद्रीय नेते यात्रेत सहभागी होऊ शकले नाहीत, असे दिल्लीतील नेत्यांनी नमूद केले. इंडी आघाडीतील काही घटकपक्षांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. (Rahul Gandhi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community