पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही, त्यासाठी एनडीएच्या घटक पक्षांची मदत घ्यावी लागली आहे, मात्र यावेळी मंत्री पदे देताना ४ खासदारामागे १ मंत्रिपद हा फॉम्युला चर्चेत होता, परंतु हे मंत्री पदे पक्षातील संख्येनुसार वाटण्यात आली नाही. शपथविधीमध्ये एनडीएच्या ७२ मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला ६ मंत्रीपदे मिळाली, त्यातील ४ मंत्री भाजपाचे आहेत, तर २ मंत्रीपदे घटक पक्षाला देण्यात आली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला मंत्रीपद नाहीच
महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रीपदी नितीन गडकरी, पीयूष गोयल या दोन खासदारांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले, हे दोघे खासदार भाजपाचे आहेत. तर राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांची मंत्रीपदी वर्णी लावण्यात आली आहे. राज्यमंत्री पदी आरपीआयचे रामदास आठवले वर्णी लागली आहे. यातही दोन राज्यमंत्री पदे भाजपाला देण्यात आली आहेत. यामध्ये मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसे यांची नावे आहेत. महाराष्ट्राच्या वाट्याला देण्यात आलेल्या मंत्रिपदांवरून ६ पैकी ४ मंत्रीपदे भाजपाला देण्यात आली आहेत. तर केवळ आरपीआय आणि शिवसेनेला प्रत्येकी १ मंत्री देण्यात आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षाला एकही मंत्रिपद देण्यात आले नाही.
Join Our WhatsApp Community