‘व्यापाऱ्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला’; Shiv Sena UBT चे संजय राऊत व्यापाऱ्यांवर का घसरले?

1412
‘व्यापाऱ्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला’; Shiv Sena UBT चे संजय राऊत व्यापाऱ्यांवर का घसरले?
‘व्यापाऱ्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला’; Shiv Sena UBT चे संजय राऊत व्यापाऱ्यांवर का घसरले?

शिवसेना उबाठाने वारंवार गुजरातवर टीका करत गुजराती मतदारांचा रोष आधीच ओढवून घेतला आहे. आज ११ नोव्हेंबर २०२४ या दिवशी शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यापारी वर्गावर तोंडसुख घेत आता त्यांनाही दुखावले. व्यापारी आपल्या फायद्यासाठी खोटे बोलतो, भेसळ करतो, ग्राहकांना फसवतो, त्यांनीच महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला असे बेछूट आरोप केल्याने व्यापारी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. व्यापारी संघटनेने राऊत यांचा निषेध व्यक्त केला आहे. (Shiv Sena UBT)

(हेही वाचा- CJI Sanjiv Khanna : सरन्यायमूर्ती खन्ना यांचा कार्यकाळ केवळ 6 महिन्यांचा)

फायद्यासाठी फसवतो, भेसळ करतो

सोमवारी ११ नोव्हेंबरला पत्रकारांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या ३७० कलमवरील विधानावर प्रतिक्रिया विचारली असता राऊत यांनी शाह यांना व्यापारी संबोधत राज्यातील व्यापारी वर्गाला टार्गेट केले. “अमित शाह खोटं बोलत आहेत आणि व्यापारी नेहमी खोटे बोलत असतो आपल्या फायद्यासाठी. दुकानदार जो असतो हा आपल्या फायद्यासाठी एक तर भेसळ करतो किंवा खोटं बोलतो. ग्राहकांना फसवतो,” असे राऊत म्हणाले. (Shiv Sena UBT)

मराठी माणसाला कंगाल करण्याचे षडयंत्र

राऊत पुढे म्हणाले, “या महाराष्ट्रात जो राजकारणाचा चिखल केलेला त्याला जबाबदार अमित शाह, त्यांचे व्यापारी आणि त्यांची खा-खा वृत्ती जबाबदार आहे. महाराष्ट्र लुटण्यासाठी, महाराष्ट्र ओरबडण्यासाठी, मराठी माणसाला कंगाल करण्यासाठी गेल्या तीन-चार वर्षात जे षडयंत्र रचले ते अमित शाहसारख्या व्यापाऱ्यांनी, त्यामुळे आज महाराष्ट्राचा चिखल होण्याची वेळ आली आहे.” (Shiv Sena UBT)

(हेही वाचा- Ind vs SA, 2nd T20 : १७ धावांत ५ बळी घेणारा वरुण चक्रवर्ती या विक्रमांचा शिलेदार)

निवडणुकीत फटका बसू शकतो

यावर फेडरल ऑफ ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे (FRTWA) अध्यक्ष विरेन शाह यांनी राऊत यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला. ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना ते म्हणाले, “राऊत यांनी सगळ्या व्यापऱ्याना एकाच तराजूत तोलू नये आणि सरसकट व्यापऱ्यांवर टीका करणे योग्य नाही. यामुळे त्यांना येणाऱ्या निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो. व्यापारीवर्ग हा नेहमी राजकारण्यांना मदत करत आला आहे पण जर राऊत व्यापऱ्यांबद्दल असा विचार करत असतील तर ते आम्हाला मान्य नाही. आम्ही यांचा निषेध करतो. शिवसेना उबाठाच नाही कोणत्याही राजकीय पक्षाने अशी विधाने करणे टाळायला हवे,” असे विरेन शाह म्हणाले. (Shiv Sena UBT)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.