वाहतूक पोलीस सय्यद उर्मठपणे Akshata Tendulkar यांना म्हणाले, बांगलादेशात १५-२० हिंदू मेले तर काय झाले? शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

हवालदार सय्यद यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी अक्षता तेंडुलकर यांनी पोलिसांकडे केली.

1007
Akshata Tendulkar यांच्या विरोधात मुस्लिमांनी दिलेल्या तक्रारी मागील हे आहे का कारण?
दादर भागात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी फेरीवाले बस्तान मांडून आहेत. त्यांची आता अरेरावी सुरू असते. याचा प्रत्यय भाजपाच्या दादर प्रदेश सरचिटणीस अक्षता तेंडुलकर यांना आला. सेनापती बापट मार्ग येथून त्या जात असताना फेरीवाल्यांमुळे आधीचे अरुंद झालेले रस्ते आणि त्यातच अस्ताव्यस्त स्वरूपात वाहने उभी केली जात असतात, याविषयी अक्षता तेंडुलकर यांनी त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस सय्यद यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी अरेरावीची भाषा करत थेट बांगलादेशात १५-२० हिंदू मेले तर काय झाले?  मणिपूरमध्ये एवढे जण मेले तिथे तुमचे पंतप्रधान मोदी का गेले नाहीत? वर्दीत राहूनही हवालदार सय्यद याने राष्ट्रविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी त्याला निलंबित करावे, अशी मागणी भाजपाचे माहीम विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर (Akshata Tendulkar) यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात रविवार, ११ ऑगस्ट रोजी केली.
या प्रकरणी अक्षता तेंडुलकर यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांसह शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जाऊन हवालदार सय्यद यांच्या विरोधात लेखी तक्रार केली. त्यावेळी त्यांनी हवालदार सय्यद यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. तसेच याप्रकरणी आपण लेखी तक्रार मुंबई पोलिसातील आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना तक्रार देणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही तक्रार देणार आहे, असे भाजपाचे माहीम विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर (Akshata Tendulkar)  म्हणाल्या.

काय आहे प्रकरण? 

अक्षता तेंडुलकर यांनी सेनापती बापट मार्ग येथून जाताना तिथे उभे असलेल्या पोलीस हवालदार सय्यद यांना रस्त्यावर अव्यवथितपणे उभी करण्यात आलेली गाडी बाजूला करण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी अरेरावीची भाषा सुरु केली. त्याचवेळी अक्षता तेंडुलकर यांनी त्यांना हटकले आणि रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याला येथे बेकायदेशीरपणे धंदा करणारे बांगलादेशी मुसलमान कारणीभूत आहेत. त्यांच्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होते. उद्या जर इथे बांगलादेशींची संख्या वाढली तर बांगलादेशाप्रमाणे इथेही हिंदूंवर हल्ले होतील. त्यावर हवालदार सय्यद यांनी, बांगलादेशात १५-२० हिंदू मेले म्हणून काय झाले, तिकडे मणिपूर येथे इतके जण मेले तिथे तूमचे पंतप्रधान का गेले नाहीत. त्याचवेळी त्याठिकाणी आजूबाजूचे ५ मुसलमान फेरीवाले तिथे आले आणि तेही अक्षता तेंडुलकर यांच्याशी अरेरावीने बोलू लागल्या. हा सगळा प्रसंग अक्षता तेंडुलकर यांनी त्यांच्या कॅमेरात कैद करून तो फेसबुकवर ट्विट केले. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार करताना त्यामध्ये हा प्रसंग घडत असताना जे ५ मुसलमान फेरीवाले तिथे अरेरावीची भाषा करत होते, त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी, भाजपाचे माहीम विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर (Akshata Tendulkar) यांनी केली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.