कोरेगाव भीमा (Koregaon Bhima Shaurya Divas 2025) येथे 1 जानेवारीला होऊ घातलेल्या शौर्यदिनानिमित्त पुणे (PUNE NEWS) पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरवर्षी 1 जानेवारीला राज्यातील अनेक बांधव तुळापूर येथील विजयस्तंभाला (Koregaon Vijay Stambh) अभिवादन करण्यात येत असतात. यंदाही कोरेगाव (Bhima Koregaon) येथे शौर्यदिनानिमित्त सभेचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी वाहतुकीच्या मार्गात अनेक बदल करण्यात आले आहेत. (Koregaon Bhima Shaurya Divas 2025)
हेही वाचा-न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेत बदल होणार; SC Collegeum मोठा निर्णय घेणार
कोणालाही अडचण होणार नाही यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ज्यात 45 पार्किंग सेंटर आहेत. 30 हजार चारचाकी आणि ३० दुचाकी क्षमता असलेले सेंटर आहेत. (Koregaon Bhima Shaurya Divas 2025)
बदललेले मार्ग (Koregaon Bhima Shaurya Divas 2025)
- नगर रस्त्यावरील वाहतूक बदल एक जानेवारी रोजी रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहणार
- पुण्याकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बाह्यवळण मार्गावरून वळून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरा, शिरुरमार्गे नगर रस्त्याने जावे लागेल.
- सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकणकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बाह्यवळण मार्गावरून विश्रांतवाडीकडे जावे. तेथून आळंदी आणि चाकणकडे जावे.
- मुंबईकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे अहिल्यानगरकडे जावे.
- मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या लहान वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूरमार्गे अहिल्यानगरकडे जावे.
- कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रजमार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी हडपसर येथून केडगाव, चौफुलामार्गे शिरूरकडे जावे.
- इंद्रायणी नदीवरील आळंदी-तुळापूर पूल जड वाहनांस बंद करण्यात आल्याने या पुलावरून केवळ अनुयायींच्या लहान वाहनांनाच प्रवेशासाठी परवानगी देण्यात येईल.
- विश्रांतवाडी, लोहगावमार्गे वाघोलीकडे जाणारी अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येईल.
कोरेगाव भीमा सभेसाठी पाच हजार पोलीस कर्मचारी,सातशे पन्नास पोलिस आधिकारी तैनात असणार आहेत. यासोबतच एक हजार होमगार्ड आणि आठ कंपन्या काम करणार. याशिवाय, येथील परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी 50 पोलिस टॉवर , 10 ड्रोन आणि चोरी रोखण्यासाठी विशेष पोलिस रथक असेल अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. यावेळी शांतता राखण्यासाठी 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची दंगल होऊ नये यासाठी सोशल मिडीयावर निर्बंध असणार असतील. काही आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल. (Koregaon Bhima Shaurya Divas 2025)
हेही वाचा-ISRO लाँच करणार स्पॅडेक्स मिशन; डॉकिंग तंत्रज्ञान वापरणारा भारत चौथा देश बनणार
31 डिसेंबर 3000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील. तर 700 वाहतूक पोलीसही कार्यरत असतील. cctv कॅमेराचा लाइव मॉनिटरिंग होणार आहे. त्यासाठी कर्मचारी तैनात असणार आहेत. एमजी रोड, जंगली महाराज रस्ता याठिकाणी मोठी गर्दी होते त्याठिकाणी नजर ठेवण्यात येणार. ४० ठिकाणी अधिकृत पार्ट्या आणि कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली. (Koregaon Bhima Shaurya Divas 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community