आनंद दिघे हेही ‘झुकेगा नही’ म्हणणाऱ्यांमधले होते, अशी लाख मोलाची माणसे शिवसेनाप्रमुखांना मिळाली आणि त्यांच्या मुशीत तयार झालेली माणसे मला मिळाली हे माझे भाग्य आहे. आनंद दिघे हे दिवस-रात्र काम करत होते, त्यामुळे ते ५० वर्षे नाही तर १०० वर्षे जगले. म्हणून जनतेने त्यांना धर्मवीर पदवी दिली, हिंदुहृदयसम्राट, धर्मवीर या पदव्या कुठल्या विद्यापीठात मिळत नाही किंवा मागून मिळत नाही, तर लोक देत असतात, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
स्व. आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आदित्य ठाकरे, अभिनेता सलमान खान इत्यादी उपस्थित होते.
आनंद दिघे म्हणजे निष्ठा
आनंद दिघे हे कायम चमत्कारिक वाटतात. आनंद दिघे म्हटले की, ठाणेकरांचे डोळे पाणावतात, त्यामुळे असा माणूस पुन्हा होणे नाही. मी ठाणेकरांना आणि शिवसैनिकांना सांगतो की, हा सिनेमा नाही तर निष्ठा काय असते हे सांगणारा सिनेमा आहे. असे निष्ठावंत शिवसैनिक असलेली शिवसेना म्हणून वाढत गेली. त्यामुळेच शिवसेनेला संपवायला निघालेली माणसे संपून गेली आणि शिवसेना पुढे निघून गेली, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community