मुंबई महापालिकेच्या काही विभागीय सहाय्यक आयुक्तांची खांदेपालट करत महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या सहाय्यक आयुक्तांची बदली करत, एकप्रकारची मरगळ झटकण्याचा प्रयत्न केला आहे. मंगळवारी सहा सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असून, चार कार्यकारी अभियंत्यांना बढती देत सहाय्यक आयुक्तपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे बोरीवलीच्या आर-मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांना उपायुक्तपदी बढती मिळाल्यानंतर या रिक्त जागेवर कोणाही अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे बोरीवली विभागाला सहाय्यक आयुक्त देण्यात आला नसून, दुसरीकडे सर्वात मोठा आणि दाटीवाटीने वसलेल्या कुर्ला एल-विभागाचे सहाय्यक आयुक्त मनिष वळंजू यांची बदली करताना, त्याच विभागातील कार्यकारी अभियंता हरिनारायण साहू यांच्यावर सहाय्यक आयुक्तपदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे.
(हेही वाचाः सेवा खंड देत कामगार भरती करण्यास महापालिकेचा नकार)
अशा आहेत बदल्या
मुंबई महापालिकेचा कळस मजबूत, पाया कमजोर याबाबतचे वृत्त हिंदुस्थान पोस्टने प्रकाशित केले होते. यामध्ये उपायुक्तांच्या सर्व जागा भरल्या गेल्या असल्या, तरी सहाय्यक आयुक्तांच्या अनेक जागा रिक्त असून त्यांचा अतिरिक्त कारभार आजूबाजूच्या विभागातील सहाय्यक आयुक्तांच्या खांद्यावर सोपवण्यात आला आहे. यामुळे महापालिकेचा कारभार हाकताना अनेक समस्यांना लोकप्रतिनिधी व नागरिकांना संभावत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.
त्यानंतर महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांची खांदेपालट करताना सहाय्यक आयुक्त किशोरी गांधी, संध्या नांदेडकर, विश्वास मोटे, पृथ्वीराज चव्हाण, मनिष वळंजू तसेच मृदुला अंडे यांची बदली करण्यात आली आहे. तर बाजार विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश रसाळ, टी-विभागाचे कार्यकारी अभियंता राजन प्रभू, एम-पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश सागर आणि एल विभागाचे कार्यकारी अभियंता हरिनारायण साहू यांना बढती देत, त्या-त्या विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदाचा अतिरिक्त कारभार त्यांच्यावर सोपवण्यात आला आहे.
(हेही वाचाः भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात पावसाचे पाणी शिरलेच कसे? भाजपकडून विचारणा)
सहाय्यक आयुक्तांच्या कुठे झाल्या बदल्या आणि कोणती सोपवली जबाबदारी?
सहाय्यक आयुक्त किशोर गांधी: अतिक्रमण निर्मुलन पूर्व व पश्चिम उपनगरे
सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर : आर/ दक्षिण विभाग
सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे : आर /उत्तर विभाग
सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे : करनिर्धारण व संकलन विभाग
सहाय्यक आयुक्त डॉ पृथ्वीराज चव्हाण : के /पश्चिम विभाग
सहाय्यक आयुक्त मनिष वळंजू : ई /विभाग
सहाय्यक आयुक्तपदी कुणाला मिळाली बढती?
कार्यकारी अभियंता प्रकाश रसाळ : बाजार विभागाचा अतिरिक्त कारभार
कार्यकारी अभियंता राजन प्रभू : ‘टी’ विभागाचा अतिरिक्त कारभार
कार्यकारी अभियंता सुरेश सागर : एम/ पश्चिम अतिरिक्त कारभार
कार्यकारी अभियंता हरिनारायण साहू : ‘एल’ विभागाचा अतिरिक्त कारभार
Join Our WhatsApp Community