महापालिकेच्या आणखी दोन उपायुक्तांचा खांदेपालट…

133

मुंबई महापालिका उपायुक्त संगिता हसनाळे आणि चंदा जाधव यांच्या बदली आदेशानंतर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) रमाकांत बिरादर यांची बदली करून त्या खात्याच्या भार परिमंडळ दोनचे उपायुक्त हर्षद काळे यांच्या हाती सोपवला आहे. तर काळे यांच्याकडील खात्यांची जबाबदारी रमाकांत बिरादर यांच्याकडे सोपवली आहे.

दोन्ही उपायुक्तांची बदली

गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारची बदली केली जाऊ नये अशा प्रकारची प्रथा असतानाच महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी परिमंडळ दोनचे उपायुक्त व मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे समन्वय असलेल्या हर्षद काळे यांची बदली उपायुक्त( मध्यवर्ती खरेदी खाते) या पदावर केली आहे. तर रमाकांत बिरादर यांची बदली उपायुक्त (परिमंडळ २) मुंबई जिल्हा एड्स नियंत्रणा संस्थेच्या प्रकल्प संचालकपदी केली आहे. या दोन्ही उपायुक्तांची बदली गुरुवारी आयुक्त तथा प्रशासकांनी करत त्यांचा खांदेपालट केला आहे.

( हेही वाचा : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी दुपारी ट्रॅफिक ब्लॉक )

काही दिवसांपूर्वी चहल यांनी उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ.संगिता हसनाळे यांची बदली परिमंडळ एकच्या उपायुक्तपदी केली होती, तर उपायुक्त (परिमंडळ १)चंदा जाधव यांची बदली उपायुक्त(घनकचरा व्यवस्थापन)पदी केली. परंतु दोनच दिवसांमध्ये ही बदली रद्द करून डॉ.संगिता हसनाळे यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापनासह परिमंडळ एकच्या उपायुक्तपदाची जबाबदारी सोपवत चंदा जाधव यांच्याकडील परिमंडळ एकचा भारही काढून घेतला. सध्या संगिता हसनाळे या सुट्टीव असल्याने घनकचरा व्यवस्थापन विभागाचा अतिरिक्त कारभार उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांच्यावर सोपवला आहे. तर चंदा जाधव यांच्याकडे परिमंडळ एकचा तात्पुरती पदभार आहे. परंतु हसनाळे सेवेत परतल्यानंतर चंदा जाधव यांना पदाविना राहणार आहे. त्यांचे पुनर्वसन कुठल्या पदावर करावे हा मोठा यक्षप्रश्न प्रशासनापुढे असतानाच आता त्यातच दोन उपायुक्तांचा खांदेपालट करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.