शिंदे-फडणवीसांकडून बदल्यांचा बंपर धमाका, राज्यातील २० अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर

130

शिंदे-फडणवीस सरकारने २९ सप्टेंबरला तब्बल ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत पुन्हा २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या बदल्यांचा बंपर धमाक्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

( हेही वाचा : राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा; कुणाचा फायदा, कुणाला तोटा? )

मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांना वैद्यकीय शिक्षण महामंडळाच्या आयुक्तपदी बढती देण्यात आली असून, मुंबईच्या जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या जागी अस्तिककुमार पांडेय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर चव्हाण यांची मुंबईच्या विकास आयुक्तपदी (असंघटीत कामगार) बदली करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त दिपक सिंगला यांची राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सह-आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिडकोचे सह-व्यवस्थापकीय संचालक शिवराज पाटील महानंदच्या मुंबईतील व्यवस्थापकीय संचालक पदाची धुरा सांभाळतील.

कोणाची कुठे नियुक्ती?

१) मिताली सेठी – संचालक, वनामती, नागपूर
२) वीरेंद्र सिंग – व्यवस्थापकीय संचालक, माहिती आणि तंत्रज्ञान
३) सुनील चव्हाण – विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई
४) अजय गुल्हाने – अतिरिक्त महापालिका आयुक्त, नागपूर
५) दीपक कुमार मीना – अतिरिक्त आदिवासी विकास आयुक्त, ठाणे
६) विनय गौडा – जिल्हाधिकारी, चंद्रपूर
७) आर. के. गावडे – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई
८) माणिक गुरसाल – अतिरिक्त आयुक्त, उद्योग
९) शिवराज पाटील – व्यवस्थापकीय संचालक, महानंद मुंबई
१०) अस्तिक कुमार पांडे – जिल्हाधिकारी, औरंगाबाद
११) लीना बनसोड – व्यवस्थापकीय संचालक, आदिवासी विकास विभाग नाशिक
१२) दीपक सिंगला – सहआयुक्त, राज्य रस्ते विकास महामंडळ
१३) एल.एस माळी – संचालक, बहुजन कल्याण संचालनालय, पुणे
१४) एस. सी. पाटील – सहसचिव, उपमुख्यमंत्री कार्यालय
१५) डी.के खिलारी – मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा
१६) एस. के. सलीमथ – सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको
१७) एस.एम. कुर्तकोटी – मुख्य कार्यकारी अधिकारी, नंदुरबार
१८) राजीव निवतकर – आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, मुंबई आणि जिल्हाधिकारी मुंबईचा अतिरिक्त प्रभार
१९) बी.एच. पलाव्हे – मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर
२०) आर. एस. चव्हाण – सहसचिव, महसूल मुद्रांक आणि वन विभाग मंत्रालय, मुंबई

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.