मंत्रालयातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

158

गेल्या महिनाभरात तब्बल ६४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करीत शिंदे फडणवीस सरकारने बदल्यांचा बंपर धमाका उडवून दिला. त्यापाठोपाठ आता मंत्रालयातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले.

राज्य सरकारच्या आदेशानुसार, परिवहन आणि बंदरे विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांची वित्त विभागात (लेखा आणि कोषागरे) बदली करण्यात आली आहे. वित्त विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांची ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवपदी, तर ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे.

( हेही वाचा : नागपूर एनआयटीची २५२ घरे तृतीयपंथीयांना; मुख्यमंत्र्यांचे निर्देश )

वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांची परिवहन आणि बंदरे विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. पराग जैन यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या वस्त्रोद्योग विभागाचा अतिरिक्त कार्यभार उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

1988च्या बॅचचे आयएएस अधिकारी आशिष कुमार सिंग यांची वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी (लेखा आणि कोषागार) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 1993च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आभा शुक्ला यांची उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिवपदी (ऊर्जा) नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच 1994 च्या बॅचचे आयएएस अदिकारी दिनेश वाघमारे यांची विद्युत पारेषण कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. 1996 च्या बॅचचे पराग जैन नैनुतिया यांची गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणून मंत्रालयात नियुक्ती करण्यात आली आहे.

‘या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या

१) आशिष कुमार सिंग (भाप्रसे १९८८)

२) आभा शुक्ला (भाप्रसे १९९३)

३) दिनेश वाघमारे (भाप्रसे १९९४)

४) पराग जैन नैनुतिया (भाप्रसे १९९६)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.