परिवहन मंत्र्यांना वेळ मिळेना! ‘त्या’ घोषणेला मुहूर्तच नाही

इलेक्ट्रिक बसेसच्या निविदेलाच अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

104

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले परिवहन मंत्री अनिल परब सध्या इतके व्यस्त आहेत, की त्यांना परिवहन विभागाच्या महत्त्वाच्या निविदांकडे देखील बघायला वेळ नाही. अडीच वर्षांपूर्वी घोषणा होऊन देखील इलेक्ट्रिक बसला परिवहन मंत्र्यांमुळे मुहूर्त मिळालेला नाही.

मंजुरीच नाही

तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात एसटी महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेसची घोषणा करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तर एका इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण सुद्धा करण्यात आले होते. मात्र, अडीच वर्षे उलटूनही अद्याप महामंडळाची इलेक्ट्रिक शिवाई बस अजून रस्त्यावर धावलेली नाही. त्याचे कारण म्हणजे या बसेसच्या बांधणीसाठी काढण्यात आलेल्या निविदेला अद्याप मंजुरीच मिळालेली नाही.

(हेही वाचाः युपी-बिहारींना आता मुंबई नकोशी! काय आहे कारण?)

काय होता निर्णय?

वायू प्रदूषण टाळण्यासाठी महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस आणण्याचा रावते यांचा उद्देश होता. त्याप्रमाणे रावते यांच्या कार्यकाळातच इलेक्ट्रिक बसची घोषणा देखील करण्यात आली होती. पहिल्या टप्यात सुमारे 100 बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार होत्या. त्यासाठी निवडण्यात आलेल्या मार्गांवर चार्जिंग स्टेशन सुद्धा तयार करण्यात येणार होते. मात्र, अद्याप या संदर्भातील कोणतेही काम सुरू करण्यात आले नसून, इलेक्ट्रिक बसेसच्या निविदेलाच अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे वैशिष्ट्य?

इलेक्ट्रिक बस एकदा चार्ज केल्यानंतर किमान 300 किमीचा पल्ला गाठण्याची क्षमता या बसमध्ये असल्याचा दावा महामंडळाने यापूर्वी केला होता. तर मुंबई पासून जवळच्या दोन शहरांमध्ये या बसेस चालवण्यात येणार होत्या. शिवशाही ते शिवनेरीच्या मधोमध याचे प्रवासी भाडे राहणार असून, या सर्व बसेस वातानुकूलित असल्याचा दावा रावते यांनी केला होता.

(हेही वाचाः उंदराने रुग्णाला नव्हे, आरोग्य यंत्रणेला कुरतडले!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.