ड्रोनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. त्यामुळे तो दिवस दूर नाही की चार जण ड्रोनमध्ये बसून विमानतळावर जातील, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. ते नागपूरात फाॅरचून फाऊंडेशनच्या यूथ एम्पाॅवरमेंट समिटच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते.
शेतीची फवारणी असो, पहाडावरुन 200 किलोचा ड्रोनच्या सहाय्याने सफरचंद खाली आणणे असो यासारखी अनेक काम ड्रोनमुळे कमी पैशात होत आहे. त्यामुळे भविष्यात ड्रोनच्या क्षेत्रात प्रगती होऊन चार माणसे बसून काही अंतरावर सहज जाऊ शकतील, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.
तसेच, नागपूरात मिहानमध्ये 31 मार्चला इन्फोसिसचे उद्घाटन करणार असून, त्यातून 5 हजार जणांना रोजगार मिळणार आहे. मिहानच्या माध्यमातून 87 हजार जणांना रोजगार मिळाला असून, पुढील निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी 1 लाख लोकांना मिहानमध्ये रोजगार मिळेल असे संकल्प असल्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
( हेही वाचा: बेडकाने फुगायचा प्रयत्न केला की तो फुटतो, उद्धवजी तुमची तीच अवस्था; भाजपचे ठाकरेंवर टीकास्त्र )
आतापर्यंत अनेक क्षेत्रांत रोजगार निर्मिती
मिहानमध्ये 30 मार्चला इन्फोसिसचे उद्घाटन करणार आहे, त्यामधून 5 हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे. टीसीएसने यापूर्वी 7 हजार तरुणांना मिहानमध्ये रोजगार दिलेला आहे. त्यात पुढे वाढवून 30 हजार जणांना जाॅब मिळणार आहे. एससीएलमध्ये 60 हजार जणांना रोजगार मिळाला आहे. मेट्रोमुळे 13 हजार 323 लोकांना रोजगार दिला आहे. एमआयडीसी बुट्टीबोरीत 11 हजार 70 लोकांना रोजगार मिळाला आहे. उद्योग, टुरिझम सेक्टर आले तर रोजगार मिळेल आणि गरिबी सुरु होऊन समृद्धी मिळेल.
रोजगारनिर्मीतीसाठी प्रयोग गरजेचे
ड्रोनमध्ये मोठ्या प्रमाणात काम होत आहे. पहाडावर लागणारे सफरचंद खाली आणण्यासाठी त्रास होत होता. पण दोनशे किलोच्या ड्रोनच्या सहाय्याने सफरचंद खाली आणण्यात यश आले आणि फायदा झाला. तो दिवस दूर नाही की चार माणसे ड्रोनमध्ये बसतील आणि विमानतळावर जातील. त्यामुळे आपण रोजगार उपलब्ध होऊ शकतो का यासाठी प्रयोग केले पाहिजेत.
Join Our WhatsApp Community