लता दीदींनी कधी पडता काळ पाहिला नाही…राज ठाकरेंकडून आदरांजली!

111

आपल्या आवाजाने ज्यांनी आपली ओळख जगभरात निर्माण केली, ज्यांच्या स्वर्गीय सुरांनी अनेक दशकं, अनेक पिढ्यांच्या मनावर राज्य केलं, त्या स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची प्राणज्योत अखेर मालवली. ५ फेब्रुवारी रोजी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर रविवारी सकाळी ८.१५च्या सुमारास मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक अशा सर्व क्षेत्रात दुःखाचा डोंगर कोसळला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

( हेही वाचा : नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जायेगा मेरी आवाज़ ही पहचान है…देशभरातून शोक व्यक्त )

त्यांनी कधीही पडता काळ पाहिला नाही

राज ठाकरे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करत लतादींदींना आदरांजली वाहिली आहे. जगाच्या व भारताचा इतिहास पाहिला तर, लता मंगेशकर या एकमेव आहेत त्यांनी कधी पडता काळ पाहिला नाही. स्वत:च्या करिअरची सुरुवात झाल्यापासूनच त्यांनी कधीही पडता काळ पाहिला नाही कायम उंची गाठली अशा या एकमेव व्यक्तिमत्त्व आहेत. असे राज ठाकरे म्हणाले.

( हेही वाचा : लतादीदींचे निधन : दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर! )

मनसेकडून श्रद्धांजली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्वीटर पेजवरुन लता मंगेशकरांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर, मुख्यमंत्र्यांनीही राष्ट्रीय दुखवटा म्हणून सोमवार ७ फेब्रुवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.